Rinku Sing Records In IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी डबल हेडरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात महामुकाबला झाला. या सामन्यात रिंकू सिंगच्या बॅटने मैदानात अक्षरक्षा धावांचा पाऊसच पडला. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत रिंकू सिंगने पाच लगातर षटकार ठोकून सामना खिशात घातला. आख्खा क्रिकेटविश्वात रिंगू सिंगच्या वादळी खेळीची चर्चा सुरु आहे. कारण रिंकूने पाच षटकारांच्या जोरावर नवीन पाच विक्रमांना गवसणी घातली आहे. रिंकूने २१ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकार ठोकून ४८ धावांची नाबाद खेळी केली. कोणत्याही फलंदाजासाठी हे पाच विक्रम मोडणे भविष्यात एक मोठं आव्हानच असणार आहे.

१) लक्ष्य गाठताना इनिंगच्या शेवटच्या २० व्या षटकात एका फलंदाजाकडून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम
२) धावांचा पाठलाग करताना २० व्या षटकात सलग पाच षटकार ठोकण्याचा विक्रम
३) लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शेवटच्या षटकात सर्वात जास्त ३१ धावा करण्याचा विक्रम
४) रिंकू सिंगने ७ चेंडूत ४० धावा केल्या. हा आयपीएल इतिहासात एखाद्या फलंदाजाने केलेला विक्रम आहे.
५) शेवटच्या षटकात रिंकूने केलेली वादळी खेळीची आयपीएल इतिहासात नोंद झालीय.

नक्की वाचा – पराभव झाल्यानंतर कर्णधार शिखर धवन भडकला, संघाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाला, “अशा खेळपट्टीवर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातने दिलेल्या २०५ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या वेंकटेश अय्यरने ८३ धावांची खेळी करत विजयाच्या दिशेनं कूच केली होती. परंतु, १७ व्या षटकात राशिद खानने विकेट हॅट्रिक घेत केकेआरला मोठा धक्का दिला. पंरतु, रिंकूच्या चौफेर फटकेबाजीमुळं केकेआरने शेवटच्या षटकात विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आणि गुजरातचा पराभव झाला.