Who is Kwena Mafaka : आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात मोठ्या बदलासह प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने १७ वर्षीय खेळाडू क्वेना माफाका याचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला आहे. या खेळाडूला नुकतीच बदली खेळाडू म्हणून जागा मिळाली होती आणि आता त्याला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

१७ वर्षीय खेळाडूला मिळाली पदार्पणाची संधी –

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दुखापतग्रस्त श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाच्या जागी हंगाम सुरू होण्यापूर्वी १७ वर्षीय क्वेना माफाकाचा संघात समावेश करण्यात आला होता. माफाका संघातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. आतापर्यंत तो फक्त अंडर-१९ क्रिकेटमध्ये खेळला आहे.

MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष
Virat Creates History at Chinnaswamy Stadium
RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

मैदानात उतरताच रचला इतिहास –

आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वात तरुण विदेशी खेळाडूंच्या यादीत क्वेना माफाका तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, मुजीब उर रहमानने वयाच्या १७ वर्षे ११ दिवसात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. संदीप लामिछाने १७ वर्षे, २८३ दिवसांत पहिला आयपीएल सामना खेळला होती. वयाच्या १७ व्या वर्षी, क्वेना माफाका खूप वेगवान गोलंदाज असून स्विंगसह अधिक धोकादायक देखील आहे.

हेही वाचा – IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

आयपीएलमध्ये पदार्पण करणारे सर्वात तरुण विदेशी खेळाडू –

१७ वर्षे, ११ दिवस – मुजीब उर रहमान (पीबीकेएस वि डीसी, २०१८)
१७ वर्षे, २८३ दिवस – संदीप लामिछाने (डीसी वि आरसीबी, २०१८)
१७ वर्षे, ३५४ दिवस – क्वेना माफाका (एमआय वि एसआरएच, २०२४)
१८ वर्षे, १०३ दिवस – नूर अहमद (जीटी वि आरआर, २०२३)
१८ वर्षे, १७० दिवस – मिचेल मार्श (डेक्कन चार्जर्स विरुद्ध आरसीबी, २०१०)

हेही वाचा – IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर विराटने नाराज शिखरला मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल

अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये सोडलीय छाप –

दक्षिण आफ्रिकेची १७ वर्षीय क्वेना माफाका या वर्षाच्या सुरुवातीला अंडर १९ विश्वचषकादरम्यान प्रसिद्धीझोतात आला होता, जिथे त्याने २१ विकेट घेतल्या होत्या आणि १९ वर्षाखालील विश्वचषकात त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले होते. डाव्या हाताच्या गोलंदाजाच्या २१ विकेट्स हे अंडर-१९ विश्वचषकाच्या एकाच मोसमात वेगवान गोलंदाजाने घेतलेले सर्वाधिक बळी आहेत. त्याने वयाच्या १५ व्या वर्षी दक्षिण आफ्रिका अंडर-१९ संघासाठी पदार्पण केले आणि यापूर्वी दोन अंडर-१९ विश्वचषक खेळले आहेत. तो ताशी १४० किमी वेगाला स्पर्श करण्यास सक्षम आहे.