IPL 2022 LSG vs DC match result in Marathi : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ च्या हंगामातील १५ वा सामना मुंबईत डी वाय पाटील स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने २० षटकात ३ विकेट गमावून १४९ धावा करत लखनऊला १५० धावांचं लक्ष्य दिलं. लखनऊने ६ गडी राखून हे लक्ष्य प्राप्त केलं. यासह लखनऊ गुणतालिकेत ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी ३४ चेंडूत ६१ धावांची दमदार अर्धशतकीय कामगिरी करून बाद झाला. वॉर्नरला मात्र १२ चेंडूत केवळ ४ धावाच करता आल्या. यानंतर ११ व्या षटकात दिल्लीला तिसरा झटका लागला. रवि बिश्नोईने रोवमॅन पॉवेलला बोल्ड आऊट केलं. पॉवेलने १० चेंडूत केवळ ३ धावा केल्या.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
IPL 2024 DC vs LSG Match Updates in Marathi
IPL 2024 LSG vs DC : जेक फ्रेझर मॅकगर्कच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा लखनऊवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Match UpdateS
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव

पॉवेलनंतर सरफराज खान मैदानात उतरला. यानंतर पंत आणि सरफराज अखेरपर्यंत खेळले. पंतने ३६ चेंडूत ३९ धावा केल्या, तर सरफराजने २८ चेंडूत ३६ धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले. यासह दिल्लीने २० षटकात ३ विकेट गमावून १४९ धावा करत लखनऊला १५० धावांचं लक्ष्य दिलं.

लखनऊ सुपर जायंट्सची खेळी

लखनऊचा संघ १५० धावांच्या लक्षाचा पाठलाग करत मैदानात उतरला. सुरुवातीला लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलने २५ चेंडूत २४ धावांची, तर क्विंटन डी कॉकने ५२ चेंडूत ८० धावांची खेळी केली. यानंतर एविन लुईस १३ चेंडूत केवळ ५ धावा काढून बाद झाला. दीपक हुड्डाला देखील १३ चेंडूत ११ धावाच करता आल्या. अखेरीस कृणाल पांड्या आणि आयुष बदोनीने सामना लखनऊच्या खिशात टाकला. पांड्याने १४ चेंडूत नाबाद १९ धावा, तर बदोनीने ३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.

लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) आतापर्यंत चार पैकी ३ सामने जिंकत दमदार प्रदर्शन केलंय. दुसरीकडे दिल्लीने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यात दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे.

हेही वाचा : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज मनिष पांडेला ड्रॉप करण्याबाबत मोठी प्रतिक्रिया

लखनऊ सुपर जायंट्स प्लेईंग ११ (Lucknow Super Giants)

के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, एविन लुईस, दीपक हूडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अँड्रू टाय, रवि बिश्नोई, आवेश खान

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग ११ (Delhi Capitals)

ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, रॉवमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्ताफिजुर रहमान, एनरिक नॉर्टजे