scorecardresearch

Premium

IPL 2023: अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणावर रोहित शर्माची महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘अपेक्षा…’

Arjun Tendulkar Update: मागील दोन वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग आहे. परंतु त्याला अजूनपर्यंत पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.

IPL 2023 Arjun Tendulkar
अर्जुन तेंडुलकर (फोटो-ट्विटर)

IPL 2023 Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या आधी मुंबई इंडियन्स (MI) कॅम्पमधून मोठी माहिती समोर आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा लीगमध्ये पदार्पण करू शकतो. हंगाम सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मार्क बाऊचर यांनी डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूबाबत मोठे वक्तव्य केले. त्याने म्हटले आहे की व्यवस्थापनाची नजर अर्जुनवर आहे. त्याला यावर्षी पदार्पणाची संधी मिळू शकते.

अर्जुन गेल्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे, परंतु दोन्ही हंगामात तो बेंचवर बसून राहिला आहे. गेल्या रणजी मोसमात त्याने गोव्यासाठी पदार्पणातच शतक झळकावले होते. याशिवाय गोलंदाजीतही त्याने खूप प्रभावित केले होते. तो सध्या गोलंदाजी करत नसल्याचेही पत्रकार परिषदेदरम्यान उघड झाले. तो दुखापतग्रस्त असून बुधवारपासून गोलंदाजी सुरू करणार आहे.

disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Neeraj Chopra Furious After Asian Games Controversy Says I had To Throw Seven Times Neera Chopra Gold Medal Throw Video
“मला ७ वेळा थ्रो करायला लागला..”,नीरज चोप्राचा ‘गोल्डन’ थ्रो नंतर संताप; म्हणाला, “माझ्यामुळे बाकीच्यांना..”
World Cup 2023 Updates
World Cup 2023: सूर्याला विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट, सुनील गावसकरांनी सांगितले कारण
Aakash Chopra expresses concern over Ravindra Jadeja's bowling ahead of World Cup Said Strike rate has come down in ODIs
Aakash Chopra: विश्वचषकापूर्वी आकाश चोप्राने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीबाबत व्यक्त केली चिंता; म्हणाला, “वन डे मध्ये स्ट्राईक रेट…”

अर्जुन तेंडुलकरबद्दल रोहित शर्मा आणि मार्क बाउचर काय म्हणाले?

मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, “ ‘चांगला प्रश्न आहे. अपेक्षा करू शकतो.”अर्जुन तेंडुलकरने अलीकडच्या काळात चांगले क्रिकेट खेळले आहे. त्याला दुखापत झाली होती, मार्क बाउचर म्हणाला, “अर्जुन नुकताच दुखापतीतून सावरला आहे, तो आज रात्री खेळणार आहे. आशा आहे की, तो काय करू शकतो. हे आपण पाहू शकतो. मला वाटते की तो गेल्या ६ महिन्यांत खूप चांगले क्रिकेट खेळत आहे, विशेषतः गोलंदाजीच्या बाबतीत. तर होय, जर आम्ही त्याला निवडीसाठी उपलब्ध करू शकलो, तर ते आमच्यासाठी खूप चांगले होईल.”

हेही वाचा – IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला मिळाला ऋषभचा बदली खेळाडू ; ‘हा’ युवा यष्टीरक्षक-फलंदाज घेणार पंतची जागा

अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द –

अर्जुन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत केवळ ७ प्रथम श्रेणी, ७ लिस्ट ए आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने एकूण ३२ विकेट घेतल्या असून एकूण २६८ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड गेल्या वर्षी म्हणाले होते की, अर्जुनला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करण्यासाठी अजून बरेच काम करायचे आहे. रोहित शर्माच्या संघासाठी मागील हंगाम चांगला गेला नाही. संघ शेवटच्या स्थानावर राहिला होता. मुंबई इंडियन्स दोन एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध आयपीएल २०२३ मध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mark boucher and rohit sharma react to arjun tendulkars ipl debut vbm

First published on: 30-03-2023 at 10:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×