अखेर आयपीएलच्या ‘रन’संग्रामाला सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. २०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली. नाणेफेक जिंकून धोनीनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना सुरु होणापूर्वी मैदानात दोन्ही संघांनी कोरोना योद्ध्यांना सलाम केला. त्यानंतर प्रत्येक्षात सामन्याला सुरुवात झाली. क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सकडून डाव सुरूवात केली. तर धोनीने दिपक चहरच्या हातात चेंडू सोपवला. चहरने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर रोहितने खणखणीत चौकार मारत दमदार सुरुवात केली. पण चहरच्या नावे एका अनोख्या हॅटट्रिकची नोंद झाली आहे.

सलग तीन हंगामाच्या सुरुवातीला पहिला चेंडू टाकण्याचा अनोखा विक्रम दिपक चहरच्या नावावर झाला आहे. २०१८ सालच्या हंगामातील पहिला सामना मुंबई आणि चेन्नई या दोन संघात होता. यावेळी रोहित शर्माला दीपक चहरने सलग तीन चेडूवर चकवले. त्यानंतर रोहितने खणखणीत चौकारासह उत्तर दिले. पहिल्या षटकाअखेर मुंबईच्या बिनबाद ५ धावा होत्या. २०१९ म्हणजेच गेल्या वर्षी २३ मार्चला चेन्नई येथे आरसीबीच्यामध्ये सलामीचा सामना होता. या सामन्यातही चेन्नईचं प्रथम क्षेत्ररक्षण होतं. दिपक चहरने विराट कोहलीला गोलंदाजी करत सत्राची सुरुवात केली होती. यंदाच्या पर्वातीलही दिपक चहरने पहिला चेंडू टाकला आणि IPLमध्ये सलग तीन पर्व पहिला चेंडू टाकण्याचा अनोका विक्रम आपल्या नावावर केला.