बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील अटीतटीचा सामना सुरू झाला आहे. आरसीबी आणि चेन्नईसाठी हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. सलग पराभवांनंतर पुनरागमन केलेल्या आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठी गणितीय समीकरणाच्या आधारे विजय मिळवायचा आहे. तर चेन्नईने आरसीबीवर विजय मिळवल्यास थेट ते प्लेऑफमध्ये जातील. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात करून दिली आणि विराटच्या फटकेबाजीने चेन्नईला धक्के दिले.
पावसामुळे काही वेळ हा सामना थांबवण्यात आला पण या पावसाआधी आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीनेही पावसाआधी धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. पहिल्या षटकात कोहलीने संथपणे सुरुवात केली, पण दुसऱ्या षटकापासून त्याने गियर बदलून षटकारांची आतिषबाजी केली. यावेळी कोहलीने असा षटकार मारला की एमएस धोनीही वैतागलेला दिसला.
विराट कोहलीने तुषार देशपांडेच्या पहिल्या षटकात संथ सुरूवात केली. त्याने एकदाही चेंडू उचलून मारला नाही. पण त्याच्या पुढच्या षटकात त्याने सर्व धावा भरून काढल्या. आरसीबीच्या डावातील तिसऱ्या षटकात तुषार देशपांडे गोलंदाजी करत होता. चेन्नईला विकेटची प्रतिक्षा होती पण कोहली मात्र वेगळ्याच फॉर्मात होता. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. तर तिसऱ्या चेंडूवर तर ९८ मीटरचा गगनचुंबी षटकार मारला. हा षटकार पाहून खुद्द धोनीही भडकला.
Only Virat Kohli's batting can make ms dhoni lose his calmness pic.twitter.com/sATNn89A49
— leisha (@katyxkohli17) May 18, 2024
कॅप्टन कुल असलेला धोनी पहिल्यांदाच इतका भडकलेला दिसला. तुषार देशपांडे रागात त्याने चांगलाच लुकही दिला. तुषार देशपांडे कोहलीला शॉर्ट बॉल टाकत होता आणि त्यावर विराट पुढे येऊन फटका लगावत चेंडू सरळ सीमारेषेबाहेर पाठवत होता. हे पाहून धोनी वैतागून यष्टीमागून देशपांडेला काहीतरी सांगताना दिसला. विराटने त्या तिसऱ्या षटकात १३ धावा केल्या. पण या तिसऱ्या षटकानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आणि सामना थांबवण्यात आला. खेळ थांबेपर्यंत आरसीबीने ३ षटकांत ३१ धावा केल्या.
— Reeze-bubbly fan club (@ClubReeze21946) May 18, 2024
पावसाच्या हजेरीनंतर खेळपट्टी बदलल्याने धावा करताना थोडा अडथळा येत असल्याचं दिसत आहे. पावसाच्या हजेरीनंतर फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये आरसीबीने ४२ धावा केल्या. विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसीची जोडी मैदानात कायम आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.