Mumbai Indians out of playoffs race : घरच्या मैदानावर पोहोचताच हैदराबादचा संघ आपल्या जुन्या रंगात दिसला. ट्रॅव्हिस हेड आणि युवा अभिषेक शर्मा पुन्हा एकदा विजयाचे हिरो ठरले. अवघ्या ९.४ षटकांत विजय नोंदवल्यानंतर हैदराबाद संघाने गुणतालिकेत बाजी मारली आहे. त्याचवेळी प्लेऑफसाठी केएल राहुल अँड कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लीग टप्प्यात १३ सामने खेळायचे बाकी असताना अजून एकही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झालेला नाही, परंतु मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्यामुळे इतर संघासाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता किती आहे, जाणून घेऊया.
कोलकाता नाईट रायडर्स –
सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या केकेआर संघाला एकट्याला अव्वल स्थानावर राहण्याची ३६% शक्यता आहे. केकेआर संघाला यासाठी त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांमधून फक्त एक विजय मिळवूनही असे करू शकतात. गुणांच्या आधारे टॉपर राहण्यासाठी त्यांची शक्यता ६२.५% आहे. असे असले तरी, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचे त्यांना अद्याप खात्री नाही. जर त्यांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने गमावले, तर ते इतर खेळांच्या निकालांवर अवलंबून चौथ्या स्थानावर दिल्ली आणि लखनऊ बरोबर राहू शकतात. परंतु अशा परिस्थितीची संभाव्यता फक्त ०.२% आहे.
राजस्थान रॉयल्स –
केकेआरप्रमाणे राजस्थान रॉयल्सला लीग स्टेजच्या शेवटी टॉपवर राहण्याची ३६% शक्यता आहे आणि गुणांवर किमान पहिल्या स्थानासाठी बरोबरी साधण्याची ६२.५% शक्यता आहे. तरीही, त्यांनाही प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याची खात्री नाही. जर त्यांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने गमावले, तर ते इतर खेळांच्या निकालांवर अवलंबून दिल्ली आणि लखनऊ बरोबर चौथ्या स्थानावर राहू शकतात. परंतु अशा परिस्थितीची संभाव्यता फक्त ०.४% आहे.
एसआरएच आणि सीएसके –
बुधवारी हैदराबाद संघ लखनऊवर विजय मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे एकट्याने किंवा संयुक्तपणे अव्वल चारमध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता ७२% वरून जवळजवळ ९४% पर्यंत वाढली आहे. एक ते तीन इतर संघांसह संयुक्त प्रथम स्थानाची ते आशा करू शकतात आणि त्याची शक्यता ५% पेक्षा कमी आहे. सध्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सीएसकेकडे एकट्याने किंवा संयुक्तपणे पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता ७३% पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर हैदराबादप्रमाणे पहिल्या तीन अव्वल स्थानातमध्ये जागा मिळवू शकतात आणि त्याची संभाव्यता फक्त ४% आहे.
डीसी आणि एलएसजी –
सध्या पाचव्या क्रमांकावर असलेल्या डीसीला अव्वल किंवा संयुक्त अव्वल स्थानावर पोहोचण्याची कोणतीही शक्यता नाही. एकट्याने किंवा संयुक्तपणे पहिल्या चारमध्ये येण्याची शक्यता ५०% पेक्षा कमी आहे. त्यांची सर्वोत्कृष्ट परिस्थिती गुणांमध्ये दुसऱ्या स्थानासाठी बरोबरी आहे आणि ते घडण्याची शक्यता फक्त ४% पेक्षा कमी आहे. बुधवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या पराभवानंतरही लखनऊ सहाव्या स्थानावर कायम आहे. पण एकट्याने किंवा संयुक्तपणे अव्वल चार बनण्याची त्यांची शक्यता ७०% वरून ५०% पेक्षा कमी झाली. दिल्लीप्रमाणे, ते सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे अव्वल तीन मधील दुसरे स्थान मिळवू शकतात. परंतु हे घडण्याची शक्यता फक्त ४% पेक्षा कमी आहे.
आरसीबी, पंजाब, गुजरात आणि मुंबई –
सातव्या क्रमांकावर असलेला आरसीबी संघ संयुक्त तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानापेक्षा चांगली अपेक्षा करू शकत नाही आणि त्यालाही ८% पेक्षा जास्त संधी आहे. पंजाब देखील संयुक्त तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानाची आशा करू शकते आणि त्याची शक्यता फक्त ६% पेक्षा जास्त आहे. गुजरात संघाल अव्वल चार संघात स्थान मिळवण्याची शक्यता ८% पेक्षा कमी आहे. मुंबई इंडियन्स सध्या नवव्या स्थानावर आहे, परंतु मुंबई संघ आता निश्चितपणे प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. सामन्याच्या निकालांच्या ८,१९२ संभाव्य संयोजनांपैकी एकही त्यांना गुणांच्या आधारे पाचव्या स्थानापेक्षा चांगल्या स्थानावर पोहोचवू शकत नाही.