Naveen Ul Haq Reply To Virat Kohli: आयपीएल 2023 ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अभूतपूर्व इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. लखनऊ सुपर जायंट्स समोर विजयानंतर या दिशेने आरसीबी किंचित आणखी पुढे आली आहे. पण या विजयापेक्षा सामन्यानंतर घडलेल्या भांडणाने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. सामन्याच्या शेवटी, विराट कोहली आणि एलएसजीच्या नवीन-उल-हक व गौतम गंभीर यांच्यात झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या भांडणामुळे तिघांनाही मॅचच्या फीवर दंड आकारण्यात आला होता. भांडण झाल्यावर विराटने आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊनही यावर प्रतिक्रिया दिली होती. आता त्यापाठोपाठ नवीन उल- हकची कमेंट सुद्धा चर्चेत आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोहलीने नवीनला बूट दाखवत खटकणारे काही शब्द उच्चारल्याने हा वाद सुरु झाला होता. अफगाणिस्तानचा स्टार आरसीबीच्या माजी कर्णधाराकडे धाव घेत असताना तो चिडला. पंच आणि मधल्या फळीतील एलएसजीचा दुसरा फलंदाज अमित मिश्रा यांनी लगेच हस्तक्षेप केला. पण तरीही वाद पेटत गेला. दोन्ही संघांच्या पारंपरिक हस्तांदोलनाच्या वेळी दोघेही हमरीतुमरीवर उतरताच ग्लेन मॅक्सवेलने मध्ये पडून दोघांना शांत केले. यावेळी के एल राहुलने नवीनला सामजंस्य दाखवून विराटची माफी मागायला सांगितली होती पण नवीनने त्याला नकार दिला. याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नवीनने नंतर त्याच्या एका एलएसजी सहकाऱ्याला सांगितले: “मी येथे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आलो आहे, कोणाचीही दादागिरी व शिवीगाळ ऐकण्यासाठी नाही.” अफगाणिस्तानच्या स्टारने सोशल मीडियावर सुद्धा हे भांडण नेले. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की “तुम्ही ज्यासाठी पात्र आहात ते तुम्हाला मिळते. हे असंच असतं आणि असायला हवं.”

हे ही वाचा << विराट कोहली, गौतम गंभीर व नवीन उल हकच्या तुफान भांडणाचा Video व्हायरल; IPL ने तिघांना दिली मोठी शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बीसीसीआयने नवीन आणि कोहली यांच्यावर कडक कारवाई केली आहे. नवीनला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड आकारण्यात आला होता, तर विराटला संपूर्ण मॅच फीच्या रक्कमेचा दंड आकारण्यात आला आहे.