Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : आयपीएल २०२४ मधील ५१वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. विशेषत: श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज नुवान तुषाराने भेदक गोलंदाजी केली. नुवान तुषाराने पहिल्याच षटकात धोकादायक सलामीवीर फिलिप सॉल्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्याच षटकात त्याने २ विकेट्स घेत पाहुण्या संघाच्या अव्वल फळीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या कामगिरीच्या जोरावर नुवान तुषाराने मुंबई इंडियन्साठी एक खास पराक्रम केला आहे.

नुवान तुषाराने पहिल्या षटकात कोलकाताच्या स्फोटक फिलिफ सॉल्टला बाद केल्यानंतरही आपली धडाकेबाज कामगिरी सुरच ठेवली. तुषाराने सामन्याच्या तिसऱ्या षटकात प्रथम अंगक्रिश रघुवंशीला बाद केले आणि त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यरच्या बाद केले. तुषाराच्या या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईने बॅटिंग पॉवरप्लेमध्येच कोलकातावर आपली पकड घट्ट केली. कोलकाताने ३ षटकांत २८ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. या दरम्यान नुवान तुषाराना मुंबई इंडिन्ससाठी पॉवरप्लेमध्ये ३ किवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी पॉवरप्लेमध्ये ३ किंवा अधिक विकेट्स घेणारे गोलदांज –

३/५ (३) – ट्रेंट बोल्ट विरुद्ध सीएसके, शारजाह, २०२०
३/७ (२)- मिचेल जॉन्सन विरुद्ध सीएसके, मुंबई वानखेडे, २०१३
३/७ (२) – मिचेल मॅकक्लेनाघन विरुद्ध डीसी, मुंबई वानखेडे, २०१७
३/१४ (३) – डॅनियल सॅम्स विरुद्ध सीएसके, मुंबई वानखेडे, २०२२
३/२५ (२) – नुवान तुषारा विरुद्ध केकेआर, मुंबई वानखेडे, २०२४

हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅनने पत्रकार परिषदेत घातलेल्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या काय आहे खासियत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२४ च्या पॉवरप्लेमध्ये तीन किंवा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

३/१४ (३) – ट्रेंट बोल्ट (आरआर) विरुद्ध एमआय, मुंबई,
३/१५ (३) – संदीप वॉरियर (जीटी) विरुद्ध डीसी, दिल्ली
३/२३ (२)- तुषार देशपांडे (सीएसके) विरुद्ध एसआरएच, चेन्नई
३/२५ (२) – नुवान तुषारा (एमआय) विरुद्ध केकेआर, मुंबई