न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने २६ एप्रिल २०२३ पासून पाकिस्तान विरुद्ध होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी त्यांचा एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडच्या वनडे संघात दोन नवे चेहरे दिसणार आहेत. या मालिकेसाठी १५ जणांच्या संघात बेन लिस्टर आणि कोल मॅककॉकी यांचा किवी संघात समावेश करण्यात आला आहे. खरं तर न्यूझीलंडने पाकिस्तानी संघाचे माजी दिग्गज सकलेन मुश्ताक यांना आपल्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक केले आहे. मुश्ताक हे आतापर्यंत पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक होते आणि आता ते आपल्याच देशाच्या संघाविरूद्ध रणनिती आखताना दिसणार आहेत.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत किवी संघातील अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश होणार नाही. वास्तविक, न्यूझीलंडचे अनेक खेळाडू इंडियन प्रीमियर लीग २०२३चा भाग आहेत ज्यामुळे ते या मालिकेला मुकणार आहेत. या यादीत टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल यांसारख्या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. केन विल्यमसनलाही या मालिकेत सहभागी होता येणार नाही. आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती.

माजी पाकिस्तानी खेळाडूंची आगपाखड

सलमान बट्ट, दानिश कनेरिया ते इतर अनेक खेळाडूंनी न्यूझीलंडच्या या संघावर टीका केली आहे. त्यांच्या मते वरिष्ठ खेळाडूंनी आयपीएलला पहिले प्राधान्य दिले असल्याने पाकिस्ताना दौऱ्याला पाठ फिरवली आहे. एकप्रकारे त्यांनी आयपीएल टीका करताना म्हटले की, “भारत जगातील सर्व देशांतील खेळाडूंना अशाप्रकारे बांधून ठेवू शकत नाही.” तसेच त्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंवर देखील टीका केली. ते म्हणाले की, “एखाद्या लीग पेक्षा देश अधिक महत्वाचा असतो त्यामुळे त्याला आधी प्राधान्य द्यायला हवे.”

पाकिस्तान दौऱ्यावर न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी १४ एप्रिलपासून दोन्ही संघांमध्ये टी२० मालिका सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे, त्यानंतर २५ एप्रिलपासून पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. किवी संघातील अनेक मोठे खेळाडू वन डे मालिकेचा भाग नसले तरी, तरीही त्यांचा संघ खूपच चांगला दिसत आहे. टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल. न्यूझीलंडच्या संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात. याशिवाय जिमी नीशम, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, इश सोधी आणि मॅट हेनरी हे खेळाडू वन डे मालिकेत दिसतील.

हेही वाचा: IPL 2023: … प्रेक्षकांना इशारा… असे पोस्टर्स झळकावल्यास कडक कारवाई करणार! IPL गव्हर्निंग कौन्सिलची चाहत्यांना सक्त ताकीद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंड वनडे संघ: टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, चॅड बोवेस, मॅट हेन्री, बेन लिस्टर, कोल मॅककॉन्की, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर आणि विल यंग.