Pat Cummins Most Expensive Captain 2024 : २२ मार्चपासून आयपीएल २०२४ सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी सर्व संघांनी त्यांच्या सराव शिबिरात सराव सुरू केला आहे. आयपीएल २०२४च्या लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघांनी एकूण २३०.४५ कोटी रुपये खर्च केले. ज्यामध्ये फक्त ७२ खेळाडूंवर बोली लागली. तसेच यावेळी चाहत्यांना आयपीएलमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. अनेक संघांनी आपले कर्णधारही बदलले आहेत. त्यामुळे यंदा कोणत्या संघाचा सर्वात महागडा कर्णधार आहे हे जाणून घेऊया.

आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने मोठी पावले उचलली. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सशी ट्रेड करुन १५ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. त्यानंतर रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार झाला. मात्र असे असूनही तो सर्वाधिक कमाई करणारा कर्णधार नाही. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीलाही आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक मानधन मिळत नाहीये. अशा स्थितीत या मोसमात सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार कोण?

‘हा’ कर्णधार आहे सर्वात महागडा –

यावेळी आयपीएल २०२४ साठी झालेल्या लिलावात दोन सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक बोली लावण्यात आल्या. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे स्टार खेळाडू मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना २० कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली होती. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सला नुकतेच सनरायझर्स हैदराबाद संघाने कर्णधार बनवले आहे. पॅट कमिन्स हा आयपीएल २०२४ मधील सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार आहे, सनरायझर्स हैदराबादने त्याला २०.५० कोटी रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले. लखनऊ सुपर) कर्णधार केएल राहुलला (१७) मागे टाकत पॅट कमिन्स सर्वात महागडा कर्णधार ठरला आहे.

हेही वाचा – MS Dhoni : ऋतुराजच्या आधी धोनी कोणाकोणाच्या नेतृत्वाखाली आयपीएल खेळलाय, तुम्हाला ‘ही’ तीन नावे माहीत आहेत का?

आयपीएलमधील कर्णधारांचे मानधन –

पॅट कमिन्स- २०.५० कोटी (सनराईजर्स हैदराबाद)
केएल राहुल – १७ कोटी रुपये (लखनऊ सुपरजायंट्स)
ऋषभ पंत- १६ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
हार्दिक पांड्या- १५ कोटी (मुंबई इंडियन्स)
संजू सॅमसन- १४ कोटी (राजस्थान रॉयल्स)
श्रेयस अय्यर- १२.२५ कोटी (केकेआर, खेळण्यावरील सस्पेंस)
एमएस धोनी- १२ कोटी (चेन्नई सुपर किंग्स)
शिखर धवन- ८.२५ कोटी (पंजाब किंग्स)
फाफ डु प्लेसिस- ७ कोटी (आरसीबी)
शुबमन गिल- ७ कोटी (गुजरात टायटन्स)