Before Ruturaj Gaikwad know which captain MS Dhoni has played under in IPL : २२ मार्च २०२४ ही इंडियन प्रीमियर लीगमधील ऐतिहासिक तारीख ठरली आहे. हे आयपीएलमधील एका नवीन युगाच्या सुरुवातीसारखे आहे, जेव्हा एमएस धोनी त्याच्यापेक्षा जवळपास १५ वर्षांनी लहान असलेल्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळेल. ऋतुराज हा तिसरा खेळाडू असेल ज्याच्या नेतृत्वाखाली एमएस धोनी आयपीएलमध्ये खेळेल. आयपीएल २०२४ चा हा ऐतिहासिक सामना शुक्रवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.

आयपीएल २०२४ सुरू होण्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सने आपला कर्णधार बदलला. आता एमएस धोनी नव्हे, तर ऋतुराज गायकवाड सीएसकेचा कर्णधार आहे. ऋतुराज गायकवाड हा चौथा खेळाडू आहे ,जो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार आहे. त्याच्या आधी एमएस धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी सीएसकेचे नेतृत्व केले आहे. याशिवाय धोनी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. स्टीव्ह स्मिथ आयपीएल संघ पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार होता. एमएस धोनीही या संघाचा सदस्य होता.

आतापर्यंत धोनी या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे –

एमएस धोनीने एकूण ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी ७२ सामन्यांमध्ये त्याने स्वतः कर्णधारपद भूषवले. याशिवाय त्याने विराटच्या नेतृत्वाखाली १८ सामने आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ७ सामने खेळले आहेत. वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्तवाखाली देखील धोनी एक टी-२० सामना खेळला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : मराठमोळा ऋतुराज गायकवाड बनेल का महेंद्रसिंह धोनीसारखा ‘चेन्नई सुपर किंग’?

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिशेल, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान.

हेही वाचा – CSK vs RCB : विराट कोहली चेन्नईविरुद्ध रचणार इतिहास, पहिली धाव घेताच करणार खास विक्रमाची नोंद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, रीस टोपले, मोहम्मद सिराज, करण शर्मा.