कर्णधार इयॉन मॉर्गनचं नाबाद अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ याच्या जोरावर कोलकाताने महत्वाच्या सामन्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली. मॉर्गनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात अत्यंत खराब झाली.

राजस्थानने पॉवर-प्लेच्या ६ षटकात ४१ धावांत ५ गडी गमावले. यात कोलकाताच्या पॅट कमिन्सने ३ षटकात २९ धावा देत तब्बल ४ बळी टिपले. पहिल्या ६ षटकांच्या खेळात ४ किंवा जास्त बळी टिपणारा पॅट कमिन्स IPL इतिहासातील पाचवा बळी ठरला. याआधी इशांत शर्मा, शोएब अख्तर, चंडीला आणि धवल कुलकर्णी यांनी ही कामगिरी केली होती. त्यांच्यात आज कमिन्सने स्थान पटकावलं. कमिन्सने रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ आणि रियन परागला माघारी धाडलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नितीश राणा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी संयमी खेळ करत कोलकाताचा डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. पण नंतर शुबमन गिल ३६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ सुनिल नारायण, दिनेश कार्तिक, आंद्रे रसल हेदेखील स्वस्तात परतले. पण कर्णधार मॉर्गनने ६८ धावांची खेळी केली.