MI vs PBKS Match Memes & IPL Point Table: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मधील तिसरा विजय आपल्या नावे करताना गुरुवारी पंजाब किंग्जचा नऊ धावांनी पराभव केला. या विजयामुळे मुंबई इंडियन्स आता आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले आहेत तर PBKS नवव्या स्थानावर घसरले आहेत. १९३ धावांचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराह आणि जेराल्ड कोएत्झी यांनी घेतलेल्या तीन विकेट्सच्या बळावर मुंबईने १९.१ षटकात १८३ धावांत पंजाबची घोडदौड रोखली होती . या विजयामुळे पीबीकेएसच्या आशुतोष शर्माची ६१ धावांची खेळी सुद्धा एकार्थी व्यर्थ गेली. पंजाब किंग्सच्या अगदी हातातोंडाशी आलेला विजय मुंबई इंडियन्सने खेचून नेल्यावर आता PBKS ने खेळभावना दाखवत आपल्या सोशल मीडियावर एका मजेशीर पोस्टमधून दुःख व्यक्त केलं आहे.

आपण पाहू शकता की पराभवानंतर, पंजाब किंग्सच्या X (पूर्वीच्या ट्विटर) खात्यावरून मराठमोळी पोस्ट शेअर करण्यात आली होती. नटसम्राट चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या फोटोचा एक मीम बनवून पंजाब किंग्सच्या अकाउंटवर पोस्ट केला गेला. “विधात्या तू इतका कठोर का रे झालास?” असं म्हणणाऱ्या या पोस्टमधून पंजाबच्या संघाची व्यथा प्रेक्षकांसमोर मांडलेली आहे.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Hardik Pandya Shouted on Jasprit Bumrah Video
IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल
Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर हार्दिककडून आशुतोषचं कौतुक

दरम्यान, अत्यंत महत्त्वाच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाच्या कमबॅकच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंजाब किंग्सविरुद्ध सामन्यानंतर कर्णधार हार्दिक म्हणाला की, “आजचा सामना चांगलाच रंगला होता, प्रत्येकाची सर्वतोपरी परीक्षाच झाली असं म्हणता येईल. आम्ही खेळापूर्वीच हा अंदाज बांधला होता की आज आपली पात्रता तपासली जाणार आहे. असे अटीतटीचे सामने ही आयपीएलची ओळख आहे.आशुतोषने शानदार खेळी साकारली. त्याने प्रत्येक चेंडूवर षटकार-चौकार लगावण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही ठरला. आम्ही त्याच्या आजच्या खेळीसाठी व भविष्यासाठी सुद्धा आनंदी व उत्सुक आहोत”.

हे ही वाचा<< Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?

MI vs PBKS नंतर कसं दिसतंय आयपीएलचं पॉईंट टेबल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यातील निकालानंतर आता आयपीएलच्या पॉईंट टेबलवर एक नजर टाकल्यास, राजस्थान रॉयल्स सध्या सात सामन्यांत १२ गुणांसह आयपीएल २०२४ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेला कोलकाता नाइट रायडर्स, तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आणि चौथ्या क्रमांकावर असलेले सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडे प्रत्येकी ८ गुण आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, आणि मुंबई इंडियसन हे प्रत्येकी सहा गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, सातव्या स्थानी आहेत. तर गुजरात टायटन्स ६ पॉईंट्ससह आठव्या, पंजाब किंग्स चार पॉईंट्ससह नवव्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन पॉईंट्ससह तळाशी आहे.