Virat reveals about Gautam’s hug video viral : आयपीएल २०२३ च्या एलएसजी विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान किंग कोहली आणि नवीन उल हक यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. हा वाद इतका वाढला होता की तत्कालीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही त्यात उडी घेतली आणि दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. मात्र, तिघांमधील वाद आयपीएलच्या १७ व्या हंगामात संपुष्टात आला. कोलकाता विरुद्ध आरसीबी सामन्यात विराटने गौतमला मिठी मारून मैत्रीचा हात पुढे केला, तर गौतम गंभीरने स्टार फलंदाजाला मिठी मारली. आता आरसीबीच्या दिग्गज फलंदाजाने यावर मौन सोडले आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराटने केला मोठा खुलासा –

एशियन पेंट इव्हेंटदरम्यान विराट कोहलीने जुना किस्सा सांगताना गौतम गंभीरचे नाव घेताच चाहत्यांनी जल्लोष सुरू केला. त्यानंतर विराट शांत झाला आणि म्हणाला, “लोक खूप निराश झाले आहेत, कारण त्या दिवशी मी नवीनला मिठी मारली आणि मग गौती भाई आले आणि मला मिठी मारली. तुमचा (चाहत्यांचा) मसाला संपला म्हणून तुम्ही ओरडत आहात. आम्ही काय लहान मुलं आहोत का?” या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२३ मधील सामन्या झाला होता वाद –

आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. नवीन उल हक हा या वादाचा केंद्रबिंदू ठरला. पण २०२३ च्या विश्वचषकात भारतीय संघ अफगाणिस्तानशी भिडला तेव्हा चाहत्यांनी नवीनला ट्रोल करायला सुरुवात केली. पण विराटने नवीनला मिठी मारून हा मुद्दा संपवला. त्याचवेळी विराटच्या चाहत्यांनी गंभीरवरही निशाणा साधला होता. मात्र आयपीएळ २०२४ मध्ये केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात दोघांनी एकमेकांनी मिठी मारली. त्यानंतर या दोघांमधील वाद सपला असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे

टीम इंडियाच्या ‘सीता-गीता’ कोण आहेत?

या कार्यक्रमादरम्यान विराट कोहलीने टीम इंडियाच्या ‘सीता-गीता’बद्दलही खुलासा केला. विराटने त्या दोन खेळाडूंची नावे सांगितली जे एकमेकांशिवाय क्षणभरही राहू शकत नाहीत. शुबमन गिल आणि इशान किशन हे भारतीय संघाची ‘सीता-गीता’ म्हणून टॅग केले. तो म्हणाला, “सीता आणि गीता (इशान आणि शुबमन) खूप मजेदार आहेत. मलाही कळत नाही की काय होत आहे. जास्त सांगू शकत नाही पण हे लोक दौऱ्यात एकटे राहू शकत नाहीत. जर आम्ही जेवायला बाहेर गेलो, तरी हे दोघे सोबत येतात. चर्चेदरम्यानही ते नेहमी एकत्र असतात.” सध्या विराट आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसत आहे. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ३१६ धावांसह अव्वल आहे.