Rashid Khan Statement on Afghanistan legspinners: आयपीएल २०२३ मधील ४८वा सामना शुक्रवारी जयपूर येथे खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ९ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सच्या या विजयात फिरकीपटू राशिद खाननने महत्वाची भूमिका बजावली. विजयानंतर अफगाणिस्तानचा अनुभवी लेगस्पिनर राशिद खानने एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की त्याच्या देशात १००० हून अधिक लेग स्पिनर आहेत आणि प्रत्येकाला त्याच्यासारखे व्हायचे आहे.

राशिद खानच्या मते, अफगाणिस्तानातील फिरकीपटू त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील जबरदस्त कामगिरीनंतर राशिद खानने हे वक्तव्य केले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात राशिद खानने शानदारी गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १४ धावा देत ३ महत्वपूर्ण विकेट घेतल्या.

Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: दिल्लीविरूद्ध अवघ्या ५३ चेंडूतील पराभवानंतर शुबमन गिल भडकला, गुजरातच्या कर्णधाराने कोणावर फोडले पराभवाचे खापर
Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय

राशिद खानशिवाय अफगाणिस्तानचा आणखी एक लेगस्पिनर नूर अहमदही आयपीएलमध्ये खेळत आहे. दोन्ही खेळाडू गुजरात टायटन्सचा भाग आहेत. राशिदप्रमाणेच फलंदाजांनाही नूर अहमदसमोर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राशिद खान आणि नूर अहमद यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. राशिद खानने ३ विकेट्स घेतल्या आणि नूर अहमदने ३ षटकात २५ धावा देऊन २ बळी घेतले. या दोघांच्या फिरकीसमोर राजस्थान रॉयल्सचे फलंदाज फार काही करू शकले नाहीत.

हेही वाचा – IPL 2023 LSG: करुण नायरला दुसरी संधी मिळताच व्हायरल झाले जुने ट्विट, जाणून घ्या काय आहे?

अफगाणिस्तानमध्ये लेगस्पिनर्सची कमतरता नाही – राशिद खान

सामन्यानंतर राशिद खानला अफगाणिस्तानमध्ये लेगस्पिनर्सच्या मुबलकतेबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “खरे सांगायचे तर, तेथे १००० हून अधिक लेग स्पिनर्स आहेत. मी अनेक अकादमींमध्ये गेलो आणि तेथे अनेक लेग स्पिनर होते. माझ्या पहिल्या आयपीएल हंगामानंतर २५० लेग स्पिनर होते आणि आता मी आयपीएलमध्ये खेळून ६-७ वर्षे झाली आहेत.”

हेही वाचा – IPL 2023 GT vs RR: गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनचे मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आम्हाला आता अतिरिक्त…’

राशिद खान पुढे म्हणाला, “अनेक फिरकीपटू अफगाणिस्तानमध्ये माझी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. मला दररोज अनेक लेग स्पिनर्सचे व्हिडिओ मिळतात. नूर अहमद येथे चांगली कामगिरी करत आहे याचा मला खूप आनंद आहे. याशिवाय कैस अहमद आणि झहीर खान देखील आहेत, ज्यांना अद्याप आयपीएलमध्ये संधी मिळालेली नाही. या खेळाडूंमध्येही भरपूर प्रतिभा आहे.”