Ravi Shastri On Rohit Sharma Form In Ipl 2023 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२३ मध्ये धावांसाठी संघर्ष करत आहे. नेहमी आक्रमक अंदाजात खेळणारा रोहित यंदाच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितच्या फॉर्मबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सनरायझर्स हैदराबादविरोधात होणाऱ्या सामन्यात रोहितने चांगली कामगिरी करावी. रोहितसारख्या फलंदाजाला चांगली कामगिरी करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रेरणादायी गोष्टींची गरज नाही, असं शास्त्री यांनी म्हटलं आहे.

रवी शास्त्री पुढं म्हणाले, रोहित शर्माला कोणत्याही प्रकारच्या मोटिवेशनची गरज नाही. रोहितची वेळ खराब असल्यामुळं तो धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. तो दोन-तीन चेंडू खेळून बाद होत आहे. पण त्याच्या फलंदाजीतून धावांचा पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर रोहितला थांबवणं कठीण होईल. रोहित एक वेगळ्या प्रकारचा फलंदाज आहे.

नक्की वाचा – RCB vs LSG : बंगळुरु आणि लखनऊचा सामना पुन्हा होऊ शकतो का? ‘असं’ आहे समीकरण, जाणून घ्या सविस्तर माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या काही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. पंरतु, त्यानंतर मुंबईने कमबॅक करून काही सामने जिंकले. मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे. पंरतु, रोहित शर्माने चाहत्यांसह मुंबई इंडियन्सला निराश केलं आहे. रोहितने १३ सामन्यांमध्ये १९.७६ च्या सरासरीनं फक्त २५७ धावा केल्या आहेत. त्याने फक्त एकच अर्धशतकी खेळी केली आहे. रवी शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माचं दुर्भाग्य आहे. पण तो त्याने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी सुरु केली की, त्याला कुणी थांबवू शकत नाही. स्टार स्पोर्ट्सच्या स्टूडिओत शास्त्री बोलत होते.