Ravindra Jadeja Sets New Record In T-20 Cricket : बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव केला. परंतु, दुसरीकडे सीएसकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. धोनीने आयपीएलमध्ये एकाच संघासाठी २०० सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम केला आहे. तर जडेजाने त्याच्या टी-२० करिअरमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. सामन्यात सॅमसनला बाद केल्यानंतर जडेजाने टी-२० करिअरमध्ये २०० विकेट पूर्ण केल्या आहेत.
जडेजा भारताकडून टी-२० मध्ये २०० किंवा त्याहून अधिक जास्त विकेट घेणारा नववा गोलंदाज बनला आहे. याशिवाय जडेजा भारताचा असा डावखुरा गोलंदाज आहे, ज्याने टी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट घेण्याची कमाल केली आहे. तसंच, जयदेव उनादकटने टी-२० मध्ये आतापर्यंत २१० विटेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे पण तो वेगवान गोलंदाजांच्या श्रेणीत आहे. याशिवाय सीएसकेकडून आयपीएलमध्ये खेळताना जडेजाने १२० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. असा पराक्रम करून जडेजाने रविचंद्रन आश्विनची बरोबरी केली आहे. आश्विनही आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळला आहे. २००९ ते २०१५ मध्ये आश्विन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. याचदरम्याने त्याने १२१ सामन्यात १२० घेतले होते. तर जडेजाने १६० सामन्यांत १२० विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
युजवेंद्र चहल- ३०७ विकेट
आर अश्विन – २९१ विकेट
पीयूष चावला – २८० विकेट
अमित मिश्रा – २७५ विकेट
भुवनेश्वर कुमार – २५८ विकेट
जसप्रीत बुमराह – २५६ विकेट
हरभजन सिंह – २३५ विकेट
जयदेव उनादकट – २१० विकेट
रवींद्र जडेजा – २०० विकेट