IPL 2025 RCB Fans Praying TO Win IPL Trophy: आयपीएळ २०२५ च्या प्लेऑफच्या सामन्यांना आज म्हणजेच २९ मे पासून सुरूवात होत आहे. पहिला क्वालिफायर सामना आज पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण विजयी संघ थेट ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. आरसीबीने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान एका आरसीबी चाहत्याचा व्हीडिओ समोर आला आहे.
आरसीबी पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी सज्ज होत असताना चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. आरसीबीने त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद जिंकावे यासाठी देवाला साकड घालत आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक आरसीबी चाहता एका मंदिरात जाऊन संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसला.
आरसीबी आयपीएल २०२५ चे जेतेपद जिंकावे यासाठी चाहत्याने देवाला साकडं घालत असतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. आरसीबी चाहत्यांची त्यांच्या संघाशी असलेली निष्ठा आणि एक भावनिक नातं याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला आहे.
आरसीबी चाहत्यांचे या व्हीडिओने लक्ष वेधलं आहे आणि इतर अनेक चाहतेही त्याला पाठिंबा देत आहेत. लीगमधील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या आरसीबी चाहत्यांना अनेकदा ट्रॉफीच्या जवळ येऊन पराभवाचा सामना करावा लागला आहे, परंतु तरीही ते संघाच्या पाठीशी कायम उभे राहिले आहेत. पहिला क्वालिफायर सामन्यापूर्वी व्हायरल असलेल्या या व्हीडिओमुळे आरसीबीच्या विजयाची आशा अधिक उंचावली आहे.
व्हायरल व्हीडिओमध्ये चाहता आरसीबीची जर्सी घालून देवाच्या पूजेचं ताट घेऊन मंदिरात पोहोचला, ज्यामध्ये एक नोट लिहिली होतीस ज्यावर लिहिलंय की, “देवा प्लीज विराट कोहलीने आयपीएलची ट्रॉफी उचलू दे” ही नोट देवासमोर ठेवत तो प्रार्थना करताना दिसत आहे.
आरसीबीचा संघ आयपीएलमधील अखेरचा पहिला क्वालिफायर सामना २०१६ मध्ये खेळला होता, जेव्हा ते ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ आले होते, परंतु अंतिम फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर संघाला जेतेपद पटकावलं आलेलं नाही. पण यंदाचा आरसीबी संघ वेगळा आहे. कोणत्याही मोठ्या खेळाडूंवर अवलंबून न राहता संपूर्ण संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे.