आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीने खराब खेळ केला. या हंगामात तो तीन वेळा एकही धाव न करताच तंबुत परतलेला आहे. असे असताना त्याचे क्रिकेट जगतातील स्थान अजूनही कायम आहे. त्याने पंजाबविरोधात खेळताना एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये ६५०० धावांपर्यंत मजल मारणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.

हेही वाचा >> काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६० व्या सामन्यात विराट कोहली खास खेळी करु शकला नाही. त्याने १४ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. मात्र या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये ६५०० धावांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. ही धावसंख्या गाठण्यासाठी त्याला फक्त एका धावेची गरज होती. हरप्रीत ब्रारने टाकलेल्या चेंडूवर फटका मारताच त्याने ६५०० धावांचा टप्पा ओलांडला.

हेही वाचा >> काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल

विराटनंतर ६००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये सध्या पंजाब किंग्जकडून खेळणारा शिखर धवन हा एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर या रांगेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा डेविड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये ५८७६ धावा केलेल्या आहेत. तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर असून त्याने ५८२९ धावा केल्या आहेत. सध्या अनसोल्ड राहिलेला सुरेश रैना या शर्यतीत पाचव्या स्थानावर असून त्याच्या आयपीएलमध्ये ५५२८ धावा आहेत.

हेही वाचा >> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विराट कोहली या हंगामात खास खेळ करु शकलेला नाही. पंजाबविरोधातील सामन्याआधी विराटने या हंगामात २१६ धावा केल्या आहेत. तर गुजरात टायटन्सविरोधात खेळताना त्याने या हंगामातील आतापर्यंत एकमेव अर्धशतक झळकावले आहे. या हंगामात विराट तीन वेळा गोल्डन डकवर बाद झालेला आहे.