Mayank Yadav Cricket Journey : आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी पदार्पण करणाऱ्या मयंक यादवने पहिल्याच सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध अशी शानदार गोलंदाजी केली, ज्यामुळे सामन्याचा संपूर्ण मार्गच बदलून गेला. वेग आणि अचूकता हे मयंक यादवच्या आयपीएल पदार्पणातील गोलंदाजीचे उत्कृष्ट पैलू होते. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली मयंकला दिल्लीसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात धवनलाही त्याचा सामना करताना अडचण येत होती. मयंक यादवचा क्रिकेटचा प्रवास कसा होता? जाणून घेऊया.

मयंक यादव दिल्लीसाठी अंडर-१४ आणि अंडर-१६ क्रिकेट कधीही खेळला नाही, परंतु दिवंगत तारक सिन्हा यांनी त्यांची प्रतिभा पाहिली आणि त्याला ‘राजधानी एक्सप्रेस’ बनण्यास मदत केली. तारक सिन्हा यांनी भारतीय क्रिकेटला ऋषभ पंतसारखा खेळाडू दिला आहे. सोनट क्लब चालवणारे देवेंद्र शर्मा म्हणाले, “उस्ताद जी (तारक सिन्हा) एखाद्याकडे एक नजर टाकत असत आणि ते पुरेसे होते. जे ऋषभचे झाले तेच मयंकचे झाले.” २०२० मध्ये दिल्लीसाठी अंडर-१९ चाचण्यांपूर्वी मयंकवर तारक सिन्हा का रागावले होते. देवेंद्र यांनी सांगितले, कारण त्याने सर्विसेजसाठी खेळण्याची ऑफर नाकारली होती.

मयंकने सर्विसेजची ऑफर नाकारली –

देवेंद्र म्हणाला, “तो दिल्ली संघात स्थान मिळवू शकला नव्हता. सर्व्हिसेजने त्याला नोकरीची ऑफर देत होती आणि त्याला तिन्ही फॉरमॅट खेळण्याची संधी मिळेल असे आश्वासन दिले होते, पण मयंकने ही ऑफर नाकारली.” मयंकने दिग्गज प्रशिक्षकाला वचन दिले की तो दिल्ली संघात स्थान मिळवेल. दुर्दैवाने, नोव्हेंबर २०२१ मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेत सिन्हा यांचे निधन झाले.

हेही वाचा – RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

मयंकच्या पदार्पणाच्या एक महिना आधी तारक सिन्हांचे निधन –

एका महिन्यानंतर, मयंकने सेक्टर १६ स्टेडियम, चंदीगड येथे विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी पदार्पण केले. शेवटच्या दोन षटकात १२ धावांची गरज होती, मात्र मयंकने ४९व्या षटकात मेडन ओव्हर टाकत सामना जिंकला. मयंक म्हणाला, “जेव्हा सर्विसेजच्या लोकांनी मला सांगितले की माझी निवड झाली आहे, तेव्हा मी पळून गेलो. मी माझे ५० टक्केही देत ​​नव्हतो, पण मी तीन किंवा चार बाऊन्सर टाकले, ज्यामुळे ते प्रभावित झाले. पण मला दिल्लीकडून खेळायचे होते. मी दिल्लीचा मुलगा आहे आणि इथून खेळायचे होते. त्यामुळे तारक सर खूप रागावले होते.”

हेही वाचा – Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तारक सिन्हा यांनी मयंकची भरली फी –

मयंकचे वडील प्रभू यादव आपल्या मुलाच्या करिअरमधील तारक सिन्हाच्या भूमिकेबद्दल बोलताना भावूक झाले. ते म्हणाले, “ तारक सर देव आहेत. एक वर्ष माझा व्यवसाय चांगला चालला नाही. सॉनेट उन्हाळ्याच्या सुटीत शिबिर आयोजित करत असे आणि त्याची फी ६५,००० रुपये होती. मी देवेंद्रजींना विनंती केली होती की मी ते नंतर देईन आणि त्यांनी उस्तादजींना याबद्दल माहिती दिली होती. माझ्याकडे २०,००० रुपये होते आणि मी माझे पाकीट उघडताच सिन्हा सर आले आणि माझ्याकडून पाकीट हिसकावून फेकून दिले आणि म्हणाले यावर्षीची फी मी भरेन. त्याचे हे शब्द मी कधीच