IPL 2025 PBKS vs DC Highlights in Marathi: राजस्थान रॉयल्सने IPL 2025 मध्ये शानदार पुनरागमन करत सलग दुसरा विजय नोंदवला. संजू सॅमसनच्या संघाने मोसमातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्जचा त्यांच्याच घरच्या मैदानावर एकतर्फी ५० धावांनी पराभव केला. अशाप्रकारे पंजाब किंग्जला या मोसमात पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्सच्या घऱच्या मैदानावर आपल्या विजयाला ब्रेक लागला आहे.

पंजाबचे नवे माहेर असलेल्या मुल्लानपूर मध्ये झालेल्या या सामन्यात यजमान पंजाब किंग्जने शानदार फॉर्मसह उतरली होती. नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि नवे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने मोसमातील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकले. तर राजस्थान संघाने सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले होते. पण राजस्थानने विजयी घोडदौड सुरू केली असून याचा प्रत्यय पंजाबविरूद्ध सामन्यात पाहायला मिळाला.

पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत पंजाबला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले होते. पण लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने दोन मोठे विकेट घेतले. पहिल्याच चेंडूवर आर्चरने प्रियांश आर्यला क्लीन बोल्ड केलं. तर अखेरच्या चेंडूवर फॉर्मात असलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड करत पंजाबला मोठे धक्के दिले.

यानंतर मार्कस स्टॉयनिस स्वस्तात बाद झाला. पण नेहाल वढेराने ४१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावांची शानदार खेळी केली. तर मॅक्सवेल ३० धावा करत बाद झाला. पण यानंतर कोणत्याच फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि सातत्याने गमावलेल्या विकेट्समुळे पंजाब सावरू शकला नाही. राजस्थानकडून आर्चरने ४ षटकांत २५ धावा देत ३ विकेट्स घेतले. तर संदीप शर्मा, महिश तीक्ष्णा यांनी २-२ विकेट घेतले. तर कुमार कार्तिकेय, हसरंगाने १-१ विकेट घेतली.

तत्पूर्वी या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली आणि कर्णधार संजू सॅमसन-यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने अवघ्या १०.२ षटकांत ८९ धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. गेल्या ३ सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या यशस्वीने अखेर आपले कौशल्य दाखवत मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर रियान परागने अवघ्या २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी करत संघाला २०० धावांच्या पुढे नेले. पंजाबने यादरम्यान काही झेलही सोडले, ज्याचा फायदा राजस्थानला मिळाला. राजस्थानने २० षटकांत ४ गडी गमावून २०५ धावा केल्या, ही या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. पंजाबकडून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट घेतले.