Rajasthan Royals vs Gujarat Titans Updates: आयपीएलच्या ४८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा संघ १७.५ षटकांत ११८ धावांत गारद झाला. धावांचा पाठलाग करताना गुजरातने १३ षटकात ९ गडी राखून राजस्थान रॉयल्सचा सुपडा साफ केला. या दणदणीत विजयासह ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचले आहे. दुसरीकडे राजस्थानला रनरेटमध्ये खूप मोठा फटका बसला आहे.

राजस्थानचा संघ १७.५ षटकांत ११८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात गुजरातने १३.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ११९ धावा करून सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने चांगली सुरुवात केली. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ९.४ षटकांत ७१ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल ३५ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर ऋद्धिमानने कर्णधार हार्दिक पांड्यासोबत सामना संपवला. साहाने ३४ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या. त्याचवेळी हार्दिकने १५ चेंडूत ३९ धावा करून नाबाद राहिला. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले.

IPL 2024 Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Match Score in Marathi
RR vs MI Highlights, IPL 2024: यशस्वी जैस्वालच्या शतकासह राजस्थानने मुंबईवर मिळवला सहज विजय, तिलक-नेहलची खेळी व्यर्थ
Gujarat Titans vs Punjab Kings Match Highlights in Marathi
PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन
Rajasthan beat RCB by 6 wickets
RR vs RCB : राजस्थान रॉयल्सने रचला इतिहास! आयपीएलच्या दोन हंगामात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
Sunil Gavaskar's reaction to Surya
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य

राजस्थान रॉयल्सचा डाव

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात पुन्हा चांगली झाली नाही आणि जॉस बटलर केवळ ८ धावा करून बाद झाला. त्याला हार्दिक पांड्याने मोहित शर्माच्या हाती झेलबाद केले. सॅमसन आणि जैस्वाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी जलद ३६ धावा जोडल्या, पण यशस्वी ११ चेंडूत १४ धावा करून दुर्दैवाने धावबाद झाला. लवकरच, राजस्थानला आणखी एक धक्का बसला जेव्हा कर्णधार संजू सॅमसन १९ चेंडूत ३० धावा करून जोशुआ लिटलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, राजस्थानने वारंवार अंतराने विकेट गमावल्या आणि परिणामी, संघ संपूर्ण षटक देखील खेळू शकला नाही आणि १७.५ षटकात ११८ धावा करून बाद झाला.

हेही वाचा: Sachin Tendulkar: बॅटऐवजी हातात फुंकणी, चुलीवर मडकं! मास्टर ब्लास्टर नक्की शिजवतोय काय? तुम्हीही पाहून व्हाल आश्चर्यचकित…

गुजरात टायटन्सने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. त्याचा हा मोसमातील सातवा विजय आहे. त्याचे आता १० सामन्यांत १४ गुण झाले आहेत. गुजरातचा संघ केवळ तीन सामने हरला आहे. दुसरीकडे, या पराभवानंतर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे. त्याचे १० सामन्यांत १० गुण आहेत. राजस्थानचे पाच विजय आणि पाच पराभव झाले आहेत