IPL 2024 Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर म्हणजे गोलंदाजांसाठी काळचं. भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिनला सहजासहजी बाद करणं सोपी गोष्ट नसायची. कितीही महान गोलंदाज असो सचिनला चेंडू पडण्यापूर्वीच माहित असायचं की गोलंदाज कसा बॉल टाकणार आहे. फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज बॉल कसा येणार आणि तो बॉल कसा खेळायचा हे ओळखण्यात सचिन माहिर होता. आता सचिनने आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी जिओ सिनेमा स्टुडिओमध्ये हजेरी लावली होती. जिओ सिनेमासाठी समालोचन करताना सचिन यांनी गोलंदाजांचा सामना कसा करावा ते समजावून सांगितलं.

आयपीएलच्या १७व्या सीझनला आजपासून म्हणजेच १७ मार्चपासून सुरूवात झाली आहे. पहिला सामना आरसीबी विरूध्द सीएसके यांच्याविरूध्द खेळवला जात आहे. जिओ सिनेमासाठी समालोचनासाठी ख्रिस गेल, ब्रेट ली, एबी डिव्हिलियर्स सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे सारखे दिग्गज खेळाडू उपस्थित आहेत. यांच्या चर्चेदरम्यान सचिनने फार मोठी माहिती सांगितली. एखादा फलंदाज खेळत असताना समोरचा गोलंदाज कसा बॉल टाकणार आणि त्याचा बॉल ओळखत फलंदाजाने कसा फटका खेळायचा, हे ओळखण्यासाठी फलंदाजाकडे ४ संधी असतात. त्या ४ संधी कोणत्या हे सचिनने सविस्तरपणे सांगितले.

पहिली संधी – गोलंदाजाच्या हातात बॉल असताना चमक कुठल्या बाजूला आहे, डल कुठल्या बाजूला आहे, हे प्रथम ओळखावं.
दुसरी संधी – गोलंदाजाचा हात किती उंचीवर आहे आणि तो कसा बॉल रिलीज करतो.
तिसरी संधी – बॉल रिलीज झाल्यानंतर तो कोणत्या दिशेनं फिरत येतोय आणि त्यानुसार तो कोणत्या बाजूला मूव्ह होईल हे ठरतं.
चौथी संधी – बॉल पीचवर आदळल्यानंतर तिथे शॉट सिलेक्शन ठरवण्याची शेवटची संधी असते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो

सचिन हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे, याचं कारण म्हणजे त्याचा हा गाढा अभ्यास, असे आपण नक्कीच म्हणू शकतो.