Ishan Kishan Tatoo Video Viral : भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा सलामीवीर फलंदाज इशान किशन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. मैदानात भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत गगनचुंबी षटकार ठोकण्यात इशान माहीर आहेच, पण तो त्याच्या वैयक्तित जीवनातही अनेक छंद जोपासत असतो. नवनवीन फॅशन आणि ट्रेंड्समध्ये राहणे इशानला खूप आवडतं. इशान एअरपोर्टवरून जात असताना त्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. इशानने त्याच्या हातावर साईबाबांचा टॅटू काढला आहे. इन्स्टॉंट बॉलिवूडच्या इन्स्टाग्रामपेजवर इशानचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि व्हिडीओला ‘शिर्डीवाले साईबाबा…आया है तेरे दर पे सवाली’ हे गाणं लावण्यात आलं आहे. इशानने साईबाबांचा काढलेला टॅटू त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. कारण या व्हिडीओला नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्रामवर इशानचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनही देण्यात आलं आहे. इशान किशन एअरपोर्टवर असून त्याच्या हातावरील साईबाबांचा टॅटू पाहा, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘प्रगतीची चिंता करू नको, राम माझ्यासोबत आहे’. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘भावा जेवढं स्टाईल मारतोस, तेवढ्या धावापण कर.’ इशानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ८५ हजारांहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

नक्की वाचा – रिंकू सिंगनं ज्या यश दयालला पाच षटकार मारले, त्याचं कोलकाता नाईट रायडर्सनं ‘या’ शब्दांत केलं सांत्वन

इशान किशन मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज आहे. परंतु, मागील दोन्ही सामन्यात इशान किशनने चकमदार कामगिरी केली नाहीय. यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर ८ एप्रिलला वानखेडे मैदानात झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आता पुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये इशान किशन मैदानात धावांचा पाऊस पाडतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या रविवारी १६ एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि कोलकाता यांच्यात होणार आहे.