MS Dhoni Retirement In IPL : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सीएसकेसाठी खेळलेला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिसनं महेंद्र सिंग धोनीबाबत खूप मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एम एस धोनीला जर निवृत्त व्हायचं असेल, तर त्याने आधीच याबाबत जाहीर केलं पाहिजे. कारण देशभरात धोनीला फेअरवेल टूरची संधी मिळावी. धोनीला चाहत्यांकडून सर्वच ठिकाणी जबरदस्त समर्थन मिळत आहे. चाहत्यांचं धोनीवर असलेलं प्रेम पाहून स्टायरिसने टीप्पणी केली आहे.

यंदाचा आयपीएल सीजन एम एस धोनीचा शेवटचा सीजन असल्याची चर्चा क्रीडाविश्वात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्गज खेळाडूंनीही म्हटलं होतं की, त्याचं करिअर शेवटच्या टप्प्यात आहे. याच कारणास्तव चाहते धोनीला पाहण्यासाठी वेगवेगळ्या स्टेडियममध्ये जाऊन समर्थन देत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिओ सिनेमासोबत संवाद साधताना स्टायरिसने म्हटलं की, धोनी जेव्हा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेईल, त्यावेळी त्याने आधीच निवृत्ती घेण्याबाबत जाहीर केलं पाहिजे. मला असं वाटतं की, धोनीला ड्रेसिंग रुमबद्दल आपुलकी नसती तर, आता तो खेळताना दिसला नसता. जेव्हा कधी त्याला निवृत्ती घोषीत करायची असेल, त्यावेळी त्याने याबाबत सर्वांना आधीच सांगितलं पाहिजे. कारण धोनीला संपूर्ण देशभरात फेयरवेल टूर करण्याची संधी मिळेल.

नक्की वाचा – केकेआरच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी धोनीचा ‘हा’ होता मास्टरमाईंड प्लॅन, गोलंदाजही ठरला यशस्वी, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर स्टायरिस म्हणाला, धोनी भारतीय क्रिकेट आणि आयपीएलचा मोठा खेळाडू आहे. भारतीय क्रिकेट टीमसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचं योगदान खूप मोठं राहिलं आहे. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती घोषीत केली होती. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूला फेअरवेल देण्याची संधी मिळाली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याची टीम चेन्नई सुपर किंग्ज चांगलं प्रदर्शन करत आहे आणि गुणतालिकेत १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे.