Punjab Kings vs Gujarat Titans IPL Match Updates : गुरुवारी मोहालीच्या मैदानात झालेल्या आयपीएलच्या १८ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ विकेट्सने पराभव केला. या पराभवाला पंजाबची फलंदाजी कारणीभूत ठरली. फलंदाजांनी खूप जास्त धावा केल्या नाहीत, त्यामुळे सामना जिंकता आला नाही. सामना संपल्यानंतर शिखर धवनने पंजाब किंग्जच्या फलंदाजांना चांगलच धारेवर धरलं. जर तुम्ही इतके डॉट बॉल्स खेळत असाल, तर सामना जिंकता येणार नाही.

मोहालीत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने १९.५ षटकात ४ विकेट्स गमावत धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यात गुजरातचा सुरुवातीला गुजरातचा संघ अडचणीत सापडला होता. पंरतु राहुल तेवतीयाने चमकदार कामगिरी करत गुजरात टायन्सला विजय मिळवून दिला.

नक्की वाचा – कगिसो रबाडाचा पहिल्याच सामन्यात धमाका! एकच विकेट घेतली अन् रचला इतिहास, ‘या’ दिग्गज गोलंदाजाचा मोठा विक्रम मोडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्हाला फलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता – शिखर धवन

पंजाब किंग्जला त्यांच्याच घरेलू मैदानात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंजाबला हा पराभव जास्त दुख: देत असावा. कर्णधार शिखर धवनने फलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. सामना संपल्यानंतर शिखर म्हणाला, आम्ही फलकावर जास्त धावा लावल्या नाहीत, याबाबत मी सहमत आहे. जर तुम्ही डॉट चेंडूंची संख्या पाहिली तर आम्ही ५६ डॉट बॉल खेळलो. जत तुम्ही इतके डॉट बॉल खेळत असाल, तर तुम्हाला सामना जिंकता येणार नाही. त्यामुळे आम्हाला या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. जेव्हा टीम लवकर विकेट्स गमावते, त्यावेळी टीम बॅकफूटवर जाते. पण आम्हाला आता चांगलं प्रदर्शन करण्यावर भर द्यावा लागेल. आमच्या फलंदाजांना जास्त धावा कराव्या लागतील. कारण गोलंदाजांपुढं मोठं आव्हान राहणार नाही.