सध्या आयपीएलची सगळीकडे धूम आहे. या हंगामात षटकार, चौकारांचा पाऊस पडतोय. यावेळी आणखी दोन संघाचा समावेश झाल्यामुळे सामने चांगलेच चुरशीचे होत आहेत. हा हंगाम सुरु असतानाच आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्यासोबत घडलेला आयपीएलमधील एक किस्सा सांगितला आहे. अख्तरचा संघात समावेश व्हावा म्हणून केकेआरचा तत्कालीन कर्णधार सौरभ गांगुलीने अख्तरची कशी बाजू घेतली होती, हे अख्तरने सांगितले आहे.

नेमकं काय घडलं होतं ?

पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा भाग होता. त्यावेळी केकेआरने शोएबला 3.2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र संघामध्ये असूनही त्याला प्रत्यक्ष खेळण्यास संधी मिळत नव्हती. त्यातच केकेआरचे मुख्य प्रशिक्षक जॉन बुकानन यांना अख्तर फीट नसल्याचं वाटलं होतं. तोच किस्सा अख्तरने सांगितला आहे.

अख्तरने सांगितलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना “मी केकेआर संघात सामील झालो होतो. त्यावेळी माझ्यावर पीसीबीने बंदी घातली होती. त्याचवेळी केकेआरचे मुख्य प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी मी फिट नसल्याचं म्हटलं होती. बोलताना शोएब फिट नहीये असं मला वाटतंय असं, बुकानन गांलुलीला म्हणाले होते. मात्र त्यावेळी गांगुलीने तो नेहमीच अनफीट असतो. पण चिंता करु नका तो अर्धाजरी अनफीट असला तरी तो सर्वांना पुरुन उरेल, असं गांगुलीने बुकानन यांना सांगितलं होतं,” असं अख्तरने सांगितलंय. त्यानंतर अख्तरला संघात खेळण्यासाठी संधी देण्यात आली होती.