Rashmika Mandanna Dance In IPL 2023 Opening Ceremony : आयपीएल २०२३ च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये गायक अरिजीत सिंगच्या गाण्यांवर क्रिकेट चाहत्यांनीही ठुमके लगावले. अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांनी जबरदस्त नृत्य सादर करत चाहत्यांना भूरळ पाडली. रश्मिका मंदानाने नाटू नाटू गाण्यावर अप्रतिम डान्स करत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तमन्ना-रश्मिका पुष्पा चित्रपटातील गाण्यांवर थिरकली आणि नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलच्या १६ व्या हंगामाच्या सोहळ्यात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. इतकच नव्हे, तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनाही रश्मिकाच्या डान्सची भुरळ पडली. खुर्चीत बसलेल्या गावसकरांनी डान्स करण्याचा मनमुराद आनंद लुटला. गावसकरांनी ठुमके लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलच्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने वादळी अर्धशतकी खेळी करत गुजरात टायटन्सला विजयाच्या दिशेनं नेलं. गुजरातने पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. चेन्नईने दिलेल्या १७९ धावांचं लक्ष्य गुजरातच्या संघाने १९.२ षटकांत १८२ धावा करत पूर्ण केलं. गिलने ३६ चेंडूत ६३ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात गुजरातने विजयाचं शिक्कामोर्तब केलं.

नक्की वाचा – गुजरात टायटन्सविरोधात पराभव झाल्यानंतर एम एस धोनीनं केला खुलासा; म्हणाला, “आमच्याकडून ही चूक झाली आणि…”

चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाडने गुजरातच्या गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी केली. ऋतुराजने ५० चेंडूत ९२ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे चेन्नईला २० षटाकांत १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. मोईन अलीने १७ चेंडूत २३ धावा केल्या. गुजरातकडून लेग स्पिनर राशिद खान (२६), मोहम्मद शामी (२९) तर अल्झारी जोसेफने ३३ धावा देत प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar dances in commentary box after watching rashmika mandanna dance in ipl 2023 opening ceremony video viral nss
First published on: 01-04-2023 at 12:57 IST