आपल्या ऑफब्रेक गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना चकवा देणारा कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकी गोलंदाज सुनील नरेनने सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात महत्वाचा टप्पा गाठला. त्याने डावाच्या १२ व्या षटकात ख्रिस मॉरिसला बाद करुन इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील बळींचे शतक पूर्ण केले.

आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ते ११ वा खेळाडू असून पहिला परदेशी फिरकी गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनील नरेन १० व्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजच्या या गोलंदानाने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात तीन षटकात १८ धावा देऊन तीन विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने ख्रिस मॉरिसशिवाय विजय शंकर (२) आणि मोहम्मद शामी (७) या दोघांना बाद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. मलिंगाने ११० सामन्यात १५४ विकेट घेतल्या आहेत. मलिंगाने आयपीएलमध्ये सर्वच सामने मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत.
या गोलंदाजांच्या नावावर आहेत १०० पेक्षा जास्त विकेटस

अमित मिश्रा (१२७), पियुष चावला (१३०), हरभजन सिंह (१२९), ड्वेन ब्रावो(१२३), भुवनेश्वर कुमार (११५), आशिष नेहरा (१०६), विनय कुमार (१०५), आर.अश्विन (१०४), झहीर खान (१०२)