Mumbai Indians Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएल २०२४ मधून पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण सूर्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तो सुरूवातीचे काही सामने खेळताना दिसणार नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या उपलब्धतेबाबत, संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर म्हणाले की, “मुंबई इंडियन्स भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय टीमसोबत संपर्कात आहे आणि याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पण आता सूर्यकुमार यादवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हार्टब्रोकन इमोजी शेअर केला आहे. सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडणार की काय, असे चित्र दिसत आहे.

आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवने यावर्षी अद्याप एकही सामना खेळलेला नाही. भारतीय संघ डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होती, जिथे भारताला तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकाही खेळायची होती. सूर्यकुमार यादवने तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती आणि त्याला मालिकावीर देखील निवडण्यात आले होते. यानंतर त्याच्या घोट्याच्या आणि मांडीच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

सूर्यकुमारने चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो वर्कआउट करताना दिसत होता. सूर्यकुमार यादव सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असून त्याचे फिटनेस परत मिळवत आहे. १७ जानेवारीला सूर्यकुमार यादव यांनी त्याच्या शस्त्रक्रियेबाबत अपडेट दिले होते, ज्यामध्ये तो लवकरच परतणार असल्याचे लिहिले होते.

आयपीएल २०२४ मध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. IPL 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. रोहित शर्मा आयपीएल २०२४ मध्ये एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा मुंबईच्या ताफ्यात पुन्हा सामील झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यकुमार यादवसाठी २०२४ टी-२० विश्वचषकाच्या दृष्टिकोनातूनही आयपीएल खूप महत्त्वाचे आहे. २ जूनपासून आयपीएलनंतर लगेचच आयसीसी टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. सूर्या शेवटचा सामना १४ डिसेंबर रोजी खेळला होता आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ५६ चेंडूत शतक झळकावले.