Sunrisers Hyderabad beat Lucknow Super Giants by 10 Wickets : सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ५८ चेंडूत १६६ धावांचे लक्ष्य गाठून इतिहास रचला. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊ संघाने २० षटकांत ४ गडी गमावून १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाने ९.४ षटकात एकही बाद १६७ धावा करत सामना जिंकला. यासह त्याने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे.

हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी षटकांमध्ये १५० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम केला. या बाबतीत त्याने १६ वर्षे जुना विक्रम मोडला. आयपीएलमध्ये संघाने १० षटकांत १५० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सने मुंबईविरुद्ध १२ षटकांत १५५ धावांचे लक्ष्य गाठले होते. राजस्थान रॉयल्सने २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना १३.१ षटकात १५० धावा करून जिंकला होत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १३.५ षटकात १५७ धावांचे लक्ष्य पार केले होते.

Who is LSG owner Sanjeev Goenka
IPL 2024: कोण आहेत LSGचे मालक संजीव गोयंका? आधी धोनीला कर्णधारपदावरून काढलं, आता राहुलवरही भडकले
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Hardik Pandya Statement on MI defeat to KKR
IPL 2024: “आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…” मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पंड्या नेमकं काय म्हणाला?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Radhika Khera congress
“रात्री नशेत असताना ते…”, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप करत राधिका खेरांचा राजीनामा
Saneshkhali rape case
संदेशखाली प्रकरणात यु टर्न; टीएमसी नेत्यावरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपावर आरोप करत पीडित महिला म्हणाल्या, “आम्हाला कोऱ्या कागदावर…’
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

आयपीएलमधील पहिल्या १० षटकांनंतरची सर्वोच्च धावसंख्या –

१६७/० (९.४) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, हैदराबाद, २०२४
१५८/४ सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, २०२४
१४८/२ सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, २०२४
१४१/२ मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, २०२४

हेही वाचा – IPL 2024: हेड-अभिषेकची विस्फोटक फलंदाजी पाहून खुद्द सचिन तेंडुलकरही भारावला, मास्टर ब्लास्टरच्या ‘या’ पोस्टने वेधलं लक्ष

दिल्ली कॅपिटल्सचा मोडला विक्रम –

सनरायझर्स हैदराबादने जास्तीत जास्त चेंडू शिल्लक असताना १०० हून अधिक धावांचे लक्ष्य पार केले. या सामन्यात त्याने ६२ चेंडू शिल्लक असताना १६६ धावांचे लक्ष्य पार केले. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने २०२२ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे पंजाब किंग्जविरुद्ध ५७ चेंडू शिल्लक असताना ११६ धावांचे लक्ष्य गाठले होते. डेक्कन चार्जर्सने २००८ मध्ये नवी मुंबईत मुंबई इंडियन्सविरुद्ध ४८ चेंडू शिल्लक असताना १५५ धावांचे लक्ष्य पार केले होते.

ट्रॅव्हिस हेडने सुनील नरेनला टाकले मागे –

ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात अवघ्या १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्लेमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत हेड आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने चौथ्यांदा ही कामगिरी केली आहे. या प्रकरणात हेड सुनील नरेनच्या (३) पुढे गेला. पॉवरप्लेमध्ये डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६ अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : हैदराबादच्या विजयानंतर मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, आता कोणत्या संघाला किती संधी? जाणून घ्या

हेड आणि अभिषेकने ३४ चेंडूत साकारली शतकी भागीदारी –

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी ३४ चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूंमध्ये ही दुसरी वेगवान शतकी भागीदारी आहे. या बाबतीतही हेड आणि अभिषेक आघाडीवर आहेत. या दोघांनी याच मोसमात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३० चेंडूत शतकी भागीदारी केली होती. २०१५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर हरभजन सिंग आणि जगदीश सुचित यांनी ३६ चेंडूत शतकी भागीदारी केली होती.

आयपीएलमध्ये २० चेंडूत सर्वाधिक अर्धशतक झळकावणारे फलंदाज –

३- जेक फ्रेझर मॅकगर्क
३- ट्रॅव्हिस हेड
२- सुनील नरेन
२- किरॉन पोलार्ड
२- इशान किशन<br>२- केएल राहुल<br>२- निकोलस पूरन
२- यशस्वी जैस्वाल