फलंदाज विराट कोहली आणि माजी सलामीवर गौतम गंभीर या दिल्लीकर खेळाडूंमध्ये नव्याने वाद उद्भवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये सोमवारी ( १ मे ) झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल ) सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकचक झाली. या वागणुकीमुळे त्यांच्याकडून सामन्याचे संपूर्ण मानधन दंडाच्या स्वरुपात आकारलं जाणार होतं. पण, ठोठावण्यात आलेला पूर्ण दंड त्यांच्या संघाकडून आकारला जाणार आहे, असं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

सोमवारी लखनऊचे फलंदाज बाद झाल्यानंतर कोहली आक्रमक पद्धतीने जल्लोष करताना दिसला. तसेच, सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना कोहली आणि लखनऊनचा गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग बंगळूरुच्या ग्लेन मॅक्सवेलने मध्यस्थी करत हा वादं थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोहली लखनऊचा सलामीवर काएल मेयर्सशी संवाध साधता होता. तेव्हा गंभीरने मेयर्सला दूर केले.

हेही वाचा : पंजाब किंग्जची दाणादाण उडवली अन् मुंबई इंडियन्सने IPL मध्ये रचला इतिहास, १६ वर्षात पहिल्यांदाच MI नं केलं असं काही…

मग गंभीर रागाने कोहलीजवळ गेला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि अन्य खेळाडूंनी गंभीरला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फारसा फायदा झाला नाही. गंभीर आणि कोहली यांच्यात वाद झाला.

हेही वाचा : किंग कोहलीशी भिडणाऱ्या नवीन उल हकने घेतली धोनीची भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

या दोघांनी ‘आयपीएल’च्या आचसंहितेतील कलम २.२१ चे उल्लंघन केले. त्याप्रकरणी कोहली आणि गंभीर या दोघांकडून सामन्याचं संपूर्ण मानधन दंडाच्या स्वरूपात आकारलं जाणार होतं. तसेच, नवीन-उल-हकला सामन्याच्या मानधनातील ५० टक्के दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, कोहली आणि गंभीर यांच्या दंडाची रक्कम त्यांच्या संघाकडून वसूल केली जाणार आहे.