Shahrukh Khan About Virat Kohli: केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यात शाहरुख खान आणि विराट कोहलीचे हसते, खेळते अनेक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एक बॉलिवूडचा किंग, एक क्रिकेटच्या मैदानाचा किंग अशा टॅग्ससह हे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. दरम्यान शाहरुख खानने आपल्या व विराटच्या नात्याविषयी केलेला खुलासा सुद्धा क्रिकेट व बॉलिवूड प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शाहरुखने विराटला आमचा ‘दामाद (जावई)’ असं म्हटलं आहे. आपल्याला माहितच असेल की अभिनेत्री व विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने आपल्या शाहरुखसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच ओळखीचा संदर्भ देत शाहरुखने विराटबरोबरच्या मैत्रीविषयी माहिती दिली आहे.

‘मी विराट आणि अनुष्काला खूप दिवसांपासून ओळखतो’

विराटबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला, “मी त्या दोघांसह खूप वेळ घालवला आहे, माझं विराटवर प्रेम आहे, आम्ही तर म्हणतो तो आमचा जावई आहे, विराट कोहली हा आमचा म्हणजेच बॉलिवूडचा ‘दामाद’ असल्याने इतर खेळाडूंच्या तुलनेत मी त्याला सर्वात जास्त ओळखतो. शिवाय मी विराट आणि अनुष्काला खूप दिवसांपासून ओळखतो, अगदी तेव्हापासून जेव्हा ते एकमेकांना डेट करत होते आणि मी अनुष्काबरोबर शूटिंग करत होतो. त्यावेळी आमची चांगली मैत्री झाली होती.”

मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं.

शाहरुखने पुढे असंही म्हटलं की, “मी त्याला पठाणच्या टायटल गाण्यावर डान्स स्टेप्स शिकवल्या होत्या. मी त्याला भारताच्या एका सामन्यात पाहिलं होतं तो रवींद्र जडेजाबरोबर डान्स करण्याचा प्रयत्न करत होता. त्या डान्स मूव्ह्ज मीच त्याला शिकवल्या होत्या पण मला खूप वाईट वाटलं की तो इतका वाईट डान्स करत होता. मी त्यांना सांगितलं की, मला तुम्हाला डान्स शिकवू द्या, म्हणजे पुढच्या विश्वचषकात आणि इतर चॅम्पियनशिपमध्ये, जेव्हा तुम्ही डान्स कराल तेव्हा तुम्ही मला कॉल करा आणि स्टेप्स विचारा, मी सांगेन.”

हे ही वाचा<< IPL चा स्टार खेळाडू असूनही सुनील नरेन टीम मीटिंगमध्ये येऊ नये असं श्रेयस अय्यरला का वाटतं? म्हणाला, “त्याला अजिबात..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुष्का शर्मा आणि शाहरुख खानची मैत्री सुद्धा खूप जुनी आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित, रब ने बना दी जोडी (2008) मध्ये अनुष्काने शाहरुखबरोबरच बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यापाठोपाठ जब तक है जान (2012), जब हॅरी मेट सेजल (2017), झिरो (2018) आणि ए दिल है मुश्किल (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे.