Virat Kolhi New Record In IPl 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियरल लीग २०२३ मध्ये आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे. सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अटीतटीचा सामना झाला. विजयासाठी शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना लखनऊने बाजी मारली आणि सामना खिशात घातला. पंरतु, सोशल मीडियावर विराटची चर्चा रंगली आहे. कारण अप्रतिम फलंदाजी करत ४४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार ठोकून विराटने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली.

या वादळी अर्धशतकासोबतच विराटने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत राहिलेल्या अनेक संघांना मिळून त्यांच्याविरोधात पन्नासवा अर्धशतक केला. यामध्ये पुणे वॉरियर्स आणि डेक्कन चार्जर्स संघांचाही समावेश आहे. तसंच या इनिंगसोबत कोहलीने टूर्नामेंटमध्ये सध्याच्या घडीला खेळणाऱ्या इतर ९ संघांविरुद्ध बेस्ट स्कोअर केला आहे. तर जाणून घेऊयात आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर नऊ संघांविरुद्ध कोहलीने केलेल्या बेस्ट स्कोअरबाबत.

नक्की वाचा – सामन्यात झाली RCB ची परिस्थिती ‘गंभीर’ पण गौतमने बंगळुरुच्या चाहत्यांना दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन, Video होतोय व्हायरल

टीम स्कोर

सीएसके 90*
डीसी 99
जीटी 73
केकेआर 100
एमआय 92*
पीबीकेएस 113*
आरआर 72*
एसआरएच 93*
एलएसजी 61

९ पैकी ७ संघांविरुद्ध विराटने शतकी खेळीही केली आहे. अशा परिस्थितीत कोलहीच्या समोर इतर सात संघांविरुद्ध शतक करणं अजूनही आव्हानात्मक आहे. पंरतु, ज्या प्रकारे विराटचा फॉर्म सुरु आहे, ते पाहता कोहली काही सीजनमध्ये मागील स्कोरप्रमाणे शतक ठोकण्याची शक्यता आहे.