Hardik Pandya’s silence on questions about Rohit : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२४) आगामी हंगामात रोहित शर्मा फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२४पूर्वी, रोहितला मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले होते. मुंबई इंडियन्सने रोहितच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार नियुक्त केले आहे. आता सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक आणि बाउचर यांना रोहितबद्दल एक प्रश्न ज्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हार्दिक पंड्या हा मागील दोन आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्यानंतर आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी गुजरातकडून मुंबईत शिफ्ट झाला. आता मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर हार्दिक पंड्या पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे गेला. यादरम्यान हार्दिक आणि मुख्य प्रशिक्षक बाउचर यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. असाही एक प्रश्न होता, ज्याचे उत्तर हार्दिकने दिले नाही. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rohit Sharma on Mumbai Indians captaincy
रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत पहिल्यांदाच स्पष्ट विधान; म्हणाला, “संघात नवीन आलेल्यांनी माझे विचार..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

रोहितबद्दलच्या प्रश्नावर हार्दिकने बाळगले मौन –

तो प्रश्न असा होता की व्यवस्थापनाने रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेण्याचे कारण काय होते? ज्यावर हार्दिक पंड्याने मौन बाळगले. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनीही या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि पुढील प्रश्न विचारण्यास सांगितले. मात्र, रोहित शर्माशी संबंधित उर्वरित प्रश्नांची उत्तरे हार्दिक पंड्याने नक्कीच दिली. कर्णधार हार्दिक पंड्याने देखील पुष्टी केली की आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी सोमवारी (१८ मार्च) मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सराव सामना खेळेल.

हेही वाचा – IPL 2024 : रोहित शर्माचाच वारसा मी पुढे नेणार; हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना ग्वाही

रोहित शर्माचाच वारसा हार्दिक पुढे नेणार –

हार्दिक म्हणाला, “सर्वप्रथम, हे काही वेगळे घडत नाही. कारण मला काही मदत लागली तर रोहित तिथे असेल. तसेच, तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. आता त्याने त्याच्या कर्णधारपदाखाली जे काही साध्य केले आहे, ते मला पुढे घेऊ जायचे. हे विचित्र किंवा वेगळे काहीही असणार नाही. हा एक चांगला अनुभव असेल. मी माझी संपूर्ण कारकीर्द त्याच्या नेतृत्वाखाली खेळली आहे. मला माहित आहे की संपूर्ण हंगामात त्याचा हात माझ्या खांद्यावर असेल.”

हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जला तिसरा धक्का! वेगवान गोलंदाजाला दुखापत, स्ट्रेचरवरून गेला मैदानाबाहेर

२२ मार्चपासून रंगणार आयपीएल २०२४ चा थरार –

सध्या आयपीएल २०२४ च्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २२ मार्चपासून आयपीएल २०२४ सुरू होत आहे. १७ दिवसांच्या कालावधीत एकूण २१ सामने होतील. हे २१ सामने १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२४ मधील पहिला सामना २२ मार्च रोजी रात्री ८ वाजता महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होईल.