सचिन तेंडुलकर २४ एप्रिल रोजी ५० वर्षांचा झाला आहे. सचिनने दोन दशकांहून अधिक काळ भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. निवृत्तीपूर्वी त्याने त्याचे विश्वचषक जिंकण्याचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले. तो केवळ चाहत्यांसाठीच देव नाही, तर सहकारी खेळाडूही त्याला आपला समस्यानिवारक किंवा देवदूत मानतात. निदान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सचिनबद्दल असाच विचार करतो. युवराजने सचिन तेंडुलकरचे ‘संरक्षक देवदूत’ असे वर्णन केले आहे.

युवराज म्हणाला की, “माझ्यासाठी सचिन हा केवळ क्रिकेटचा आदर्श नाही, तर लाइफ कोचसारखा सपोर्ट सिस्टीम आहे. आयुष्यात जेव्हा कधी कठीण प्रसंग आले, मग ते मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर, त्यांनी मला नेहमीच मार्ग दाखविला. युवराज सिंगने २००७चा टी२० विश्वचषक आणि २०११चा एकदिवसीय विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. युवराज सचिनसोबत भरपूर क्रिकेट खेळला आणि ड्रेसिंग रूममध्येही त्याने त्याच्यासोबत बराच वेळ घालवला.

हेही वाचा: Sachin Tendulkar @50: “तांत्रिकदृष्ट्या कोणीही श्रेष्ठ…”, कोहली-तेंडुलकरच्या तुलनेवर पॉटिंगचे सूचक विधान

पीटीआयशी बोलताना युवराज सिंग म्हणाला, “जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचो तेव्हा आमच्याकडे प्रशिक्षक असायचे. पण मला फलंदाजीत काही तांत्रिक अडचण आली तर हक्काने मी सचिन पाजी यांना सांगायचो. माझ्यासाठी सचिन हा ‘गो-टू पर्सन’ होता. तो मला माझ्या समस्यांवर उपाय सांगायचा आणि क्रिकेटमधला तो माझा आदर्श नव्हता तर माझा देव, सखा, मित्र आहे.”

सचिन माझा संरक्षक देवदूत: युवराज

युवराज पुढे म्हणाला, “२२ यार्डांच्या बाहेरही सचिन माझ्यासाठी गार्डियन एंजलसारखा होता. माझ्या आयुष्यात जेव्हा कधी मला वैयक्तिक समस्या आली, तेव्हा मी ज्यांना पहिल्यांदा कॉल केले त्यांपैकी ‘सचिन पाजी’ हे एक होते आणि माझ्यासाठी ते नेहमीच सर्वोत्तम सल्ला देत असत.”

हेही वाचा: MS Dhoni, IPL 2023: “हे मला फेअरवेल देण्यासाठी आले होते…” माहीने हसत हसत दिला संकेत, चाहत्यांच्या मनातील धडधड वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सचिनला माझ्या तब्येतीची काळजी होता’: युवराज

युवराजने २०११च्या विश्वचषकादरम्यानचा त्याचा किस्सा सांगितला. कर्करोगाची लक्षणे त्याला जाणवू लागली होती. युवराज खोकला, तापाने खूप त्रस्त होता, रात्रभर झोप येत नव्हती. असे असतानाही त्याने या स्पर्धेत शानदार खेळ करत ३५० धावा काढण्याबरोबर १५ विकेट्स घेतल्या. अशी अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताला चॅम्पियन बनविण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्या कालावधीबद्दल बोलताना युवराज म्हणाला, “मला कॅन्सर झाल्याचेही माहीत नव्हते. सचिन नेहमी येऊन माझी चौकशी करायचा आणि नंतर अमेरिकेत उपचार सुरू असतानाही त्याला माझ्या तब्येतीची काळजी असायची. तो मला भेटायलादेखील आला होता.