scorecardresearch

Premium

“मी चुकलो… ” यशस्वी जैस्वालने जोस बटलरच्या ‘त्या’ विकेटसाठी माफी का मागितली? कारण वाचून वाटेल अभिमान

RR VS KKR Match Highlights: केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात यशस्वीने आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा पराक्रमही केला. जैस्वालने केवळ १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण…

Yashasvi Jaiswal Says Sorry To Jos Buttler, RR Vs KKR Match Highlights, IPL 2023 Point Table,
"मी चुकलो… " यशस्वी जैस्वालने जोस बटलरच्या 'त्या' विकेटसाठी माफी का मागितली? कारण वाचून वाटेल अभिमान (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

RR vs KKR Yashasvi Jaiswal: आयपीएल २०२३ मधील ५६ वा सामना राजस्थाान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. या सामन्यात राजस्थाानने कोलकाताचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार खेळी केली. जैस्वालने ४७ चेंडू, १३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ९८ धावा केल्या. केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात यशस्वीने आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा पराक्रमही केला. जैस्वालने केवळ १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण, जैस्वालच्या दमदार खेळाच्या सुरुवातीलाच सलामीचा जोडीदार जोस बटलर धावबाद झाला . यात आपलीच चूक होती असे म्हणत जैस्वालने मॅचनंतर महत्त्वाचा खुलासा केला आहे.

जोस भाई आउट झाले पण…

दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर, जैस्वालने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला जो त्याला स्वतःलाच जे शक्य वाटत नव्हते, ज्यामुळे जोस बटलर नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी धावबाद झाला. जैस्वालला बटलरने थांबण्यास सांगितले होते, परंतु जैस्वालला त्याचा इशारा न समजल्याने त्याने आपली जागा सोडली आणि मग त्याला वाचवण्यासाठी जोस बटलरने आपली विकेट गमावली. याविषयी स्वतः जैस्वालने भाष्य केले आहे.

IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG 1st Test : “द्रविडने शुबमनबरोबर…”, गिलच्या खराब कामगिरीनंतर केविन पीटरसनने दिला महत्त्वाचा सल्ला
Pope and Bumrah Controversy in Ind vs ENG 1st Test Match
IND vs ENG : जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम पंगा घेतल्याने रोहितला करावी लागली मध्यस्थी, VIDEO होतोय व्हायरल
DDCA accused of dropping Ayush Badoni from the team to make way for Kshitij Sharma
Ranji Trophy 2024 : दिल्लीवर भेदभाव केल्याचा आरोप, क्षितिजसाठी बदोनीला वगळले, धडा शिकवण्यासाठी कापली मॅच फी
Kevin Sinclair cartwheel
क्रिकेटच्या मैदानावर कोलांटउड्या सेलिब्रेशन व्हायरल; वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरची धमाल

“मी जोस भाईकडून खूप काही शिकतो पण आज माझ्या चुकीच्या कॉलमुळे त्यांना त्याची विकेट सोडावी लागली आणि मी त्याचा खूप आदर करतो. आपल्या सर्वांना माहित आहे की खेळात असं सगळं होतं, कोणीही हे जाणूनबुजून करत नाही, म्हणूनच मग जेव्हा संजू मैदानात आला तेव्हा मला म्हणाला, काळजी करू नकोस, तुझा खेळ खेळत राहा, तू छान खेळतोयस ” बटलर तीन चेंडूत शून्यावर परतला तेव्हा जयस्वाल २७ धावांवर होता.

जेव्हा नितीश राणा समोर आला तेव्हा…

पहिल्याच षटकात नितीश राणाला सामोरे जाण्याची भीती किंवा आश्चर्य वाटले का असे विचारले असता जयस्वाल म्हणाले, “नाही मला आश्चर्य वाटले नाही कारण मला माहित होते की ते या विकेटवर समोरचा संघ फिरकीपटू वापरू शकतात पण जेव्हा मी नितीश भाईंना येऊन गोलंदाजी करताना पाहिले, मी धावा काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि शॉट्स मारण्यासाठी मला स्वतःला खूप पाठींबा द्यावा लागला. मी बर्‍याच दिवसांपासून प्रयत्न करत होतो की जर मी क्रीजवर असेल तर मी मॅच फिनिश करेन आणि आजही माझ्या मनात तेच होते.”

हे ही वाचा<< नवीन उल हकच्या टोमण्यावर विराट कोहलीची नवी प्रतिक्रिया; आरसीबी हरल्यावर म्हणाला, “तुमच्या डोक्यात…”

दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकात ८ गडी गमावून १४९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने केवळ १ विकेटच्या मोबदल्यात १३.१ षटकात लक्ष्य गाठले. यशस्वी जैस्वालशिवाय कर्णधार संजू सॅमसनने २९ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. त्याचबरोबर युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेतल्या. तसेच तो आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yashasvi jaiswal says sorry to jos buttler wicket says you got out in rr vs kkr match highlights ipl 2023 point table svs

First published on: 12-05-2023 at 13:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×