Jasprit Bumrah Injury Update Ahead of Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सध्या सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात पुन्हा गोलंदाजीसाठी उतरलेला नाही. पण आता बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीवर उपचार सध्या न्यूझीलंडमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन स्काउटिंग करत आहेत. त्यांच्या रिपोर्ट्स आणि फीडबॅकच्या आधारे बुमराह न्यूझीलंडला जाऊन सल्ला घेऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय आधीच बुमराहच्या बॅकअपची योजना आखत आहे. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन स्काउटेन यांच्या रिपोर्टनंतरच बुमराहच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तामध्ये बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, “बोर्डाची वैद्यकीय टीम न्यूझीलंडमधील स्काउटन यांच्या संपर्कात आहे. बोर्डाने बुमराहच्या न्यूझीलंड दौऱ्याचेही नियोजन केले होते, मात्र हे अद्याप झालेले नाही. निवडकर्त्यांना माहित आहे की दिलेल्या वेळेत बुमराह १०० टक्के तंदुरुस्त झाल्यास हा एक चमत्कार असेल.”

स्काऊटन यांनी बुमराहच्या दुखापतीवर यापूर्वी शस्त्रक्रियाही केली आहे. टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये दुखापतीमुळे बुमराह खेळू शकला नव्हता, त्यावेळे स्काऊटन यांनीच बुमराहवर शस्त्रक्रिया केली होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, “बुमराहचे रिपोर्ट्स न्यूझीलंडमधील त्याच्या डॉक्टरांना पाठवण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या फिडबॅकवर बुमराह न्यूझीलंडला जाणार की नाही हे निश्चित होईल. बुमराहचे पुढील काळासाठी संघातील स्थान लक्षात घेता बोर्ड आणि बुमराह याबाबत घाई करू इच्छित नाहीत.”

चॅम्पियन ट्रॉफी २०२५ साठीच्या संघांमध्ये ११ फेब्रुवारीपर्यंत बदल केले जाऊ शकतात. भारत-इंग्लंड तिसऱ्या वनडेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहची संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान निवडकर्त्यांनी हर्षित राणाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. बुमराह तंदुरुस्त नसल्यास हर्षित राणाला पुढील आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत संघात संधी दिली जाईल का, हे पाहण्यासारखं असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा