India vs Ireland Jasprit Bumrah : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सध्या आयर्लंडच्या डब्लिन शहरातील ‘दी व्हिलेज’ स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह मैदानात उतरले आहेत. टीम इंडियाची कमान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हातात आहे. तर आयर्लंडचं नेतृत्व स्फोटक फलंदाज पॉल स्टर्लिंग करत आहे. या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

जसप्रीत बुमराहने तब्बल ११ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. ११ महिन्यांनी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांचं बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष होतं. बुमराहनेही त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करत जोरदार पुनरागमन केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यानंतर बुमराहने पहिला चेंडू टाकला अन् भारतीयांच्या चिंता वाढल्या. कारण, या चेंडूवर आयर्लंडचा सलामीवीर अँड्र्यू बाल्बर्नीने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर शानदार चौकार लगावला. परंतु, अँड्र्यूचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण पुढच्याच चेंडूवर बुमराहने त्याला त्रिफळाचित केलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केलं. त्यानंतर पुढचे दोन चेंडू निर्धाव ठरले. पाचव्या चेंडूवर बुमराहने लॉर्कन टकर याला यष्टीरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केलं.

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
Mumbai Indians captain Hardik Pandya arguing with umpire
DC vs MI : दिल्लीच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानंतर हार्दिक पंड्या अंपायरवर संतापला, काय होत कारण?
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान

भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत आयलर्डंच्या संघाची अवस्था बिकट केली आहे. आतापर्यंत (८.२५ वाजेपर्यंत) ११ षटकात आयर्लंडने ६ गड्यांच्या बदल्यात ६० धावा जमवल्या आहेत. आयर्लंडचा अर्धा संघ ५.२ षटकात ३१ धावांमध्ये माघारी परतला होता. त्यानंतर कर्टलीस कॅम्फर आणि मार्क अडैरने आयर्लंडचा डाव सावरला. बुमराहने आतापर्यंत २ षटकांत १० धाव देत २ गडी बाद केले आहेत.

दरम्यान, जसप्रीत बुमराह हा टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. क्रिकेटच्या या प्रकारात भारताचं नेतृत्व करणारा बुमराह हा ११ वा खेळाडू ठरला आहे. वीरेंद्र सेहवागने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं नेतृत्व केलं होतं.

हे ही वाचा >> Shikhar Dhawan: “शिखर धवनला न्याय… आशिया कपपूर्वी माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य

रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णचं पदार्पण

रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांना आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आहे. या दोन्ही खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. प्रसिद्ध कृष्णा याआधी एकदिवसीय क्रिकेट खेळला आहे. परंतु, रिंकूचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे.