Asia Cup 2025 Japrit Bumrah Blasts at Former Indian player: भारतीय संघ आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. जसप्रीत बुमराहची आशिया चषकातील कामगिरी थोडी वरखाली राहिली आहे. बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबतही बरीच चर्चा सुरू आहे. याशिवाय आशिया चषकानंतर लगेच होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीही बुमराहची संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने बुमराहबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यावर बुमराहने उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफच्या ट्विटवरून उत्तर देत त्यांचं म्हणणं खोट असल्याचं बुमराहने म्हटलं आहे. कडक टीका केली आहे.एक्सवर कैफने बुमराहच्या गोलंदाजीच्या रणनीती आणि वर्कलोड व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बुमराहने यावर थेट उत्तर दिलं आहे. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी हा वाद चर्चेत आला आहे, जिथे भारत पाकिस्तान किंवा बांगलादेशशी भिडणार आहे.

आशिया चषकात टीम इंडिया वेगळ्या रणनितीसह खेळत आहे. जसप्रीत बुमराह हा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट मानला जातो. या स्पर्धेत तो त्याच्या चार पैकी तीन षटकं पॉवरप्लेमध्ये टाकत आहे, ज्यामुळे मोहम्मद कैफने पोस्ट शेअर करत यावर प्रश्न उभारला.

मोहम्मद कैफने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बुमराह शेवटच्या षटकांमध्ये जास्त गोलंदाजी करत असे. पण, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली असं होत नाहीये, जी फलंदाजांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

कैफने पोस्टमध्ये म्हटलं, रोहितच्या नेतृत्वाखाली, “बुमराह सामान्यतः १, १३, १७ आणि १९ वी षटकं टाकत असे. सूर्याच्या नेतृत्वाखाली, त्याने आशिया चषकात पॉवरप्लेमध्ये तीन षटकं टाकली आहेत. दुखापत टाळण्यासाठी, बुमराह त्याचे शरीर उबदार ठेवून गोलंदाजी करण्याला प्राधान्य देत आहे. उर्वरित १४ षटकांमध्ये बुमराहचं एक षटक फलंदाजांसाठी मोठा दिलासा देणारं आहे, यामुळे विश्वचषकात बलाढ्य संघांविरुद्ध भारताला धक्का बसू शकतो.”

बुमराहने या पोस्टला उत्तर देत लिहिलं आहे की, ‘आधीही चुकीचं म्हटलं, नंतर पुन्हा चुकीचं म्हटलंय.’ म्हणजेच बुमराहने कैफचा हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.

बुमराहने २०२५ च्या आशिया चषकामध्ये चार सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७.३३ च्या इकॉनॉमी रेटने पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याला शेवटच्या गट सामन्यात सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान, २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बुमराहचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. यावरून हे देखील स्पष्ट होतं की बुमराह सध्या पूर्णपणे फिट आहे.