Bumrah vs Shaheen: Absurd statement of former Pakistan all-rounder Abdul Razzaq said Bumrah is not even equal to Shaheen Afridi | Loksatta

Bumrah vs Shaheen: बुमराहला आधी म्हटला ‘बेबी बॉलर’… आता शाहीन आफ्रिदीशी तुलना, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने तोडले अकलेचे तारे

भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेकदा तुलना केली जाते. आता पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने स्टार वेगवान गोलंदाजांची तुलना केली. जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदीची तुलना करत त्याने विचित्र विधान केले आहे.

Bumrah vs Shaheen: Absurd statement of former Pakistan all-rounder Abdul Razzaq said Bumrah is not even equal to Shaheen Afridi
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Abdul Razzaq on Jasprit Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हे सध्याच्या काळातील सर्वात घातक वेगवान गोलंदाज आहेत. बुमराह सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याचबरोबर शाहीन आफ्रिदीही बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दोघांमध्ये तुलना आहेत आणि कोणती चांगली आहे हे सांगणे प्रत्येकासाठी कठीण आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने बुमराहबाबत अजब विधान केले आहे.

त्यांच्या संघावर बुमराह आणि आफ्रिदीचा प्रभाव प्रचंड आहे. दोन्ही वेगवान गोलंदाज जवळपास सारखेच प्रभावी आहेत, पण अब्दुल रझाक वेगळा विचार करतात. त्याचा असा विश्वास आहे की बुमराह आपल्या देशाचा मुख्य वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या बरोबरीचा नाही. रझाकने अलीकडेच एका पाकिस्तानी टीव्हीशी संवाद साधताना सांगितले की, “शाहीन खूप चांगला आहे, बुमराह त्याच्या आसपासही येत नाही.”

बुमराह व्यतिरिक्त आणखी एक गोलंदाज आहे ज्याचे नाव जगात आहे. तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आहे. कधी कधी या गोलंदाजांचीही तुलना केली जाते. दोघेही आपापल्या संघासाठी जवळपास बरोबरीचे आहेत. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही देशांत चुरशीची स्पर्धा आहे. यावेळी बुमराहची तुलना शाहीन आफ्रिदीशी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक याला बुमराह अजिबात आवडत नाही. याआधीही त्याने बुमराहबद्दल मोठी गोष्ट सांगितली होती, त्यानंतर वाद निर्माण झाला होता.

हेही वाचा: Harmanpreet Kaur: अंडर-१९ वर्ल्डकप जिंकताच महिला खेळाडूंना वाढला दबदबा, हरमनप्रीत कौर आघाडीच्या स्पोर्ट्स ब्रँडची होणार ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

बुमराहपेक्षा शाहीन सरस – अब्दुल रझाक

नसीम शाह, हरिस रौफ आणि शाहीन यांच्यापैकी कोण चांगले आहे, असे विचारले असता रझाकने उत्तर दिले, “तिघेही चांगले आहेत.” बुमराहबाबत रझाकने असे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१९ मध्ये रझाकने बुमराहला “बेबी बॉलर” म्हटले होते आणि दावा केला होता की तो अजूनही खेळत असता तर त्याने भारतीय वेगवान गोलंदाजावर वर्चस्व गाजवले असते.

रझाकने त्यानंतर क्रिकेट पाकिस्तान या एका शो मधील चर्चेत बोलताना सांगितले की, “मी ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रम सारख्या महान गोलंदाजांविरुद्ध खेळलो आहे, त्यामुळे बुमराह माझ्यासमोर एक बाळ गोलंदाज आहे आणि मी त्याच्यावर सहज वर्चस्व मिळवू शकतो.” अब्दुल रझाकने बुमराहची तुलना शाहीन आफ्रिदीशी केली आणि म्हणाला, “शाहीन आफ्रिदी बुमराहपेक्षा चांगला आहे. तो शाहीनच्या पातळीच्या जवळपासही नाही. ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही तो टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाबद्दल म्हणाला होता, “मी ब्रेट ली आणि शोएब अख्तरसारख्या गोलंदाजांनाचा वेगही पाहिला आहे, त्यामुळे बुमराह हा त्या तोडीचा गोलंदाज नाही.”

हेही वाचा: Hockey WC 2023: हॉकी फेडरेशनचे मोठे पाऊल! भारतीय प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, विश्वचषकातील पराभव लागला जिव्हारी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध परतणार!

नुकतेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने परतल्यावर सांगितले होते की, “सध्या तरी ते स्पष्ट नाही. तो पहिले २ कसोटी सामने खेळणार नाही. मला आशा आहे की तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे २ कसोटी सामने खेळेल. आम्ही त्यांच्यासोबत कोणतीही संधी घेऊ इच्छित नाही आणि पाठीच्या दुखापती नेहमीच गंभीर असतात. यानंतर आम्हाला भरपूर क्रिकेट खेळायचे आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:20 IST
Next Story
विश्लेषण: फुटबॉलमधील ‘रॅशफोर्ड सेलिब्रेशन’ म्हणजे काय? रॅशफोर्डच्या कृतीचा नेमका अर्थ काय?