Jasprit Bumrah Successful Surgery: होळीच्या शुभमुहूर्तावर भारतीय संघाला एक मोठी बातमी मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. न्यूझीलंडमध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या बुमराहवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता या शस्त्रक्रियेनंतर बुमराहला मैदानात परतण्यासाठी किमान ६ महिने लागू शकतात. अशा परिस्थितीत बुमराह यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी झाली

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर आता एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये त्याच्या सहभागाच्या आशा वाढल्या आहेत. मात्र, बुमराहला मैदानात परतण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळताना दिसणार नाही.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

पाठीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह आधीच आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. आता त्याच्यासमोर विश्वचषकासारखी महत्त्वाची स्पर्धा आहे. २०२३ मध्ये, ५० षटकांचा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केला जाईल. असं असलं तरी पाठीच्या समस्येपासून सुटका व्हायला खूप वेळ लागतो. बुमराहला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी चार आठवडे लागतील, असे अधिकृतपणे सांगितले जात आहे. परंतु पुनर्प्राप्ती प्रक्रिया लांब आहे. कारण बरे झाल्यानंतर पुनर्वसन सुरू होईल, ज्याला तीन ते पाच महिने लागू शकतात. अशा स्थितीत बुमराहसमोर विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होण्याचे कठीण आव्हान आहे.

हेही वाचा: INDvsAUS: इशान किशन कसोटी पदार्पण करणार की केएस भरतला पुन्हा संधी मिळणार; द्रविडने दिले संकेत, कोण असेल यष्टीरक्षक?

क्राइस्टचर्चमध्ये बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी झाली

चांगली गोष्ट असली तरी बुमराहच्या पाठीवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी तो न्यूझीलंडला गेला होता आणि सध्या तिथे आहे. त्यांची क्राइस्टचर्चमधील शस्त्रक्रिया प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन शौटेन यांनी केली. पाठीची दुखापत कोणत्याही खेळाडूसाठी विशेषतः वेगवान गोलंदाजांसाठी अत्यंत धोकादायक असते. अशा परिस्थितीत तो लवकरात लवकर बरा होऊन मैदानात परतेल, अशी आशा या स्टार वेगवान गोलंदाजाच्या चाहत्यांना आहे.

बुमराहची न्यूझीलंडमध्ये याच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. जिथे इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर उपचार करण्यात आले. त्याचवेळी न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज शेन बाँडनेही या डॉक्टरकडे उपचार घेतले होते.

हेही वाचा: Harmanpreet Kaur birthday special: महिला क्रिकेट संघाची धाकड खेळाडू हरमनप्रीत कौर! जाणून घ्या आतापर्यंतचा तिचा प्रवास

टीम इंडियाने अनेक सामने जिंकले

जसप्रीत बुमराह डावाच्या सुरुवातीला अतिशय किलर गोलंदाजी करतो, त्याच्याकडे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे. तो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने भारतासाठी ३० कसोटी सामन्यात १२८ विकेट्स, ७१ एकदिवसीय सामन्यात १२१ बळी आणि ६० टी२० सामन्यात ७० बळी घेतले आहेत. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.