अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी तुलनेने फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये केएस भरतची फलंदाजीतील खराब कामगिरी लक्षात घेऊन भारतीय संघ व्यवस्थापनाने झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला चौथ्या आणि अंतिम कसोटी सामना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतो. केएस भरतला गेल्या एक वर्षापासून ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून तयार केले जात होते आणि तो भारत ‘अ’ संघाचा नियमित सदस्य होता. मात्र, तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांत केवळ ८, ६, २३*, १७ आणि ३ धावा करू शकला.

केएस भरतचे संथ आणि वळण घेणाऱ्या विकेट्सवरील विकेटकीपिंग मात्र प्रभावी ठरले. इंदोरमध्ये तो काही चेंडूंवर अपयशी ठरला ही वेगळी गोष्ट. पण पाच डावात केवळ ५७ धावा करणे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरले नाही. चेंडू वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर धावा काढण्यासाठी भारतीय फलंदाज धडपडत असताना व्यवस्थापनाला चांगल्या खेळीची अपेक्षा होती.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भारताच्या फलंदाजीतील खराब फॉर्मबद्दल विचारले असता, तो त्याच्या बचावासाठी पुढे आला. राहुल द्रविड म्हणाला, “आम्ही फार काळजी करत नाही आणि भारतीय फलंदाज पुन्हा आव्हाने आणि परिस्थिती समजून घेतील. त्याने फार मोठे योगदान दिले नसले तरी गेल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १७ धावा केल्या.”

हेही वाचा: Harmanpreet Kaur birthday special: महिला क्रिकेट संघाची धाकड खेळाडू हरमनप्रीत कौर! जाणून घ्या आतापर्यंतचा तिचा प्रवास

तो पुढे म्हणाला, “भरतने दिल्लीत उपयुक्त योगदान दिले जेथे त्याने सकारात्मक फलंदाजी केली. यासोबतच, तुम्हाला अशा परिस्थितीत थोडेसे नशीब हवे आहे जे कदाचित त्याच्यासोबत नसेल. त्याच्या खेळात सुधारणा होत असून त्याने विकेटकीपिंग खूप चांगले केले आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून फलंदाजीतील कामगिरी पाहण्याची गरज आहे.” मंगळवारी नेट प्रॅक्टिसदरम्यान द्रविडने इशान किशनसोबत बराच वेळ घालवला. भारतीय संघाच्या सराव सत्रात मात्र संघ व्यवस्थापनाचा विचार स्पष्टपणे दिसून आला नाही आणि भरतला मंगळवारी ऐच्छिक सराव सत्रात विश्रांती देण्यात आली. मात्र, तो बुधवारी सराव सत्रात सहभागी होण्याची शक्यता आहे.

मोटेराची विकेट फलंदाजीसाठी अनुकूल दिसते आणि त्यात जरी उसळी असली तरी ती इशान किशनच्या आक्रमक फलंदाजीसाठी योग्य असेल आणि अशा स्थितीत संघ व्यवस्थापन त्याला संधी देऊ शकते. ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन ऑफ-स्पिनर असणे केवळ किशनच्या विरोधात जाते कारण त्याला बाहेरचे टर्न चेंडू खेळणे कठीण जाते. परंतु हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये घडले आहे जेथे त्यांना सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टिकोन स्वीकारावा लागतो.

हेही वाचा: WPL 2023, DC-W vs UPW-W: ताहिला मॅकग्राची एकाकी झुंज अपयशी! दिल्ली कॅपिटल्सचा यूपी वॉरियर्सवर ४२ धावांनी दणदणीत विजय

दोन्ही संघातील खेळाडूंची यादी:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया: स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.