scorecardresearch

ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अर्जुनचा सामना कार्लसनशी

भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने शनिवारी व्हिएतनामच्या लिएम क्वँग ली याला पराभूत करत ज्युलियस बेअर चषक ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अर्जुनचा सामना कार्लसनशी
ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा

न्यूयॉर्क : भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने शनिवारी व्हिएतनामच्या लिएम क्वँग ली याला पराभूत करत ज्युलियस बेअर चषक ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी १९ वर्षीय अर्जुनचा सामना जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे.

 अर्जुन-लिएम यांच्यातील पहिला डाव बरोबरीत सुटला, पण दुसऱ्या डावात अर्जुनने विजय मिळवत आघाडी घेतली. तिसरा डाव बरोबरीत सुटल्यानंतर चौथ्या डावात लिएमने विजय मिळवत एकूण लढतीत बरोबरी साधली. मात्र, विजेता ठरवण्यासाठी झालेल्या टायब्रेकरमध्ये अर्जुनने सलग दोन डाव जिंकत अंतिम सामन्यातील आपले स्थान निश्चित केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या