ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना बोर्डाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये पदावरून हटवले होते. बुधवारी त्यांनी त्यांच्याशी संबंधित बातम्या लीक करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. लँगर यांनी अशा लोकांना निनावी भ्याड संबोधले. ते म्हणाले, त्या लोकांनी प्रशासकीय मंडळाशी चांगले संबंध ठेवायला हवे होते. ५२ वर्षीय लँगर यांना फेब्रुवारीमध्ये प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले होते. प्रशिक्षक म्हणून ते यशस्वी झाले. यादरम्यान, २०२१ मध्ये अॅशेस मालिका जिंकण्याबरोबरच त्याने टी२० विश्वचषकही जिंकला. टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांना केवळ ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे लँगर नाराज होते. त्याच्या जाण्यानंतर काही खेळाडूंनी त्याच्याबद्दल ऑस्ट्रेलियन मीडियाकडे अज्ञातपणे तक्रार केली होती.

जस्टिन लँगर यांचे संघावर आरोप

कोड स्पोर्ट्सशी बोलताना जस्टिन लँगर म्हणाला, “माझ्यासमोर सगळे चांगले वागत होते. पण मी त्याबद्दल वाचत होतो. संघातील खेळाडू माझ्या पाठीमागे असे काही बोलतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता. ते पुढे म्हणाले, “अनेक पत्रकार स्त्रोत, सूत्र हा शब्द वापरतात. तो शब्द डरपोक असा बदला असे मला म्हणायचे आहे. भ्याड म्हणतो स्रोत नाही. लँगरच्या मते, ‘सेज अ सोर्स’ म्हणजे काय? त्यांच्याकडे एकतर एखाद्यासोबत काम करण्याचा मार्ग आहे. ते तुमच्यासमोर येऊन सांगणार नाहीत, किंवा ते फक्त त्यांच्या अजेंड्यासाठी गोष्टी बाहेर सांगतील ड्रेसिंग रूममधील माहिती लिक करतील. तसे त्यांनी मागे अनेकवेळा केले देखील आहे.

हेही वाचा :   IND vs BAN: जडेजाच्या जागी ‘या’ स्टार खेळाडूला बांगलादेश दौऱ्यावर कसोटी पदार्पणाची मिळू शकते संधी

जस्टिन लँगर यांच्यारवर कोणी टीका केली?

अ‍ॅरॉन फिंच, पॅट कमिन्स आणि माजी कसोटी कर्णधार टिम पेन यांसारख्या वरिष्ठ ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लँगरवर टीका केली होती. तो त्याच्या प्रशिक्षण शैलीच्या विरोधात होता. मग प्रश्न असा आहे की लँगर या खेळाडूंना भित्रा म्हणत आहे का? न्यूज कॉर्प मीडियानुसार, लँगर म्हणाले, “माझ्यासमोर सर्वजण चांगले वागत होते, परंतु मी वर्तमानपत्रात काहीतरी वेगळेच वाचत होतो. मी देवाला आणि माझ्या मुलांची शपथ घेतो की वर्तमानपत्रे काय लिहित आहेत यावर माझा विश्वास बसत नाही. अनेक पत्रकार सूत्रांचा हवाला देत होते. मी म्हणेन की हा शब्द भ्याड असा बदलला पाहिजे.” ते म्हणाले, “कारण सूत्रांनी याचा अर्थ काय आहे, असे सांगितले. एकतर ते कोणाचा तरी बदला घेण्यासाठी हे करत आहेत आणि तुमच्यासमोर सांगायला घाबरतात किंवा त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी ते हे करत आहेत. मला या सर्व गोष्टींचा तिरस्कार आहे.

हेही वाचा :   IND vs NZ: संजू सॅमसन-उमरान मलिकच्या प्रश्नावर हार्दिक पांड्या संतापला, म्हणाला “हा माझा संघ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जस्टिन लँगर यांनी ऑस्ट्रेलियाला पुन्हा उभारी दिली होती

बॉल टॅम्परिंगमुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रतिमेवर काळे डाग पडले होते. ऑस्ट्रेलियन संघावर चौफेर टीका होत होती. वॉर्नर-स्मिथसारख्या दिग्गज खेळाडूंवर बंदी घातल्याने संघाचा समतोल बिघडला होता, त्यावेळी लँगरने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी संघाची पुनर्बांधणी केली. मात्र त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. ही गोष्ट आजपर्यंत लँगरला खटकत आहे.