“केएल राहुल भारताचा कर्णधार होऊ शकतो”; माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

विराट कोहली याने विश्वचषकानंतर टी २०चं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण याबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

Sunil-Gavaskar-KL-Rahul
केएल राहुल भारताचा कर्णधार होऊ शकतो; माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी (Photo- Reuters/File Photo)

विराट कोहली याने विश्वचषकानंतर टी २०चं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण याबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तर टी २० संघासाठी रोहित शर्मा हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारताच्या भावी कर्णधाराबाबत भविष्यवाणी केली आहे. भारतीय फलंदाज केएल राहुल याच्यात कर्णधारपदाचे सर्व गुण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्याला त्यासाठी तयार करणं गरजेचं असल्याचं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.

“ही चांगली बाब आहे की, बीसीसीआय संघाच्या भविष्याचा विचार करत आहे. त्यापुढे विचार करणं गरजेचं आहे. जर नविन कर्णधाराचा विचार केल्या केएल राहुलकडे पाहिलं जाऊ शकतं. त्याने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये त्याने आपल्या फलंदाजीतून दाखवून दिलं आहे. आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यात त्याची कामगिरी चांगली आहे. त्याला उपकर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता आहे.”, असं माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितलं.”आयपीएलमध्ये राहुल पंजाब किंग्सचं नेतृत्व करत आहे. त्याने आयपीएलमध्ये खूप चांगले नेतृत्व गुण दाखवले आहेत. कर्णधारपदाचं कोणतंही दडपण त्याच्यावर दिसलं नाही. त्याच्या नावाचा होणं गरजेचं आहे.”, असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.

मागील सहा महिन्यांपासून BCCI सोबत सुरु होता विराटचा वाद?; कारण ठरलं ‘या’ खेळाडूचं सिलेक्शन

केएल राहुल २९ वर्षांचा आहे. केएल राहुल आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने ६ शतकं आणि १२ अर्धशतकं झळकावली आहे. कसोटीत त्याने एकूण २,३२१ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याचा १९९ ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. त्याचबरोबर केएल राहुल ३८ एकदिवसीय सामने खेळला आहे. त्याने ५ शतकं आणि ९ अर्धशतकं झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने १,५०९ धावा केल्या आहेत. केएल राहुल ४८ टी २० सामने खेळला आहे. त्यात त्याला ४५ डावात फलंदाजीची संधी मिळाली आहे. यात त्याने २ शतकं आणि १२ अर्धशतकं झळकावली आहेत. यात त्याने १,५५७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये ८८ सामने खेळला असून ७९ डावात खेळण्याची संधी मिळाली आहे. यात त्याने २ शतकं आणि २५ अर्धशतकं झळकावली आहेत. त्यात एकूण २,९७८ धावा केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: K l rahul is captaincy material say sunil gavaskar rmt