Fastest Fifty In Indian Premier League : इंडियन प्रीमियर लीग २०२० मध्ये मैदानात धावांचा पाऊस पडला होता. आयपीएलचा १३ वा सीजन संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये खेळवण्यात आला होता. त्याआधी झालेल्या आयपीएल सीजनमध्ये भारताचा स्टार फलंदाज के एल राहुलने ५०० हून अधिक धावा कुटल्या होत्या. विशेष म्हणजे राहुलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या सामन्यात पाडला होता चौकार-षटकारांचा पाऊस

आयपीएल ११ च्या दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक महामुकाबला झाला होता. मोहालीच्या आय एस बिंद्रा स्डेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पंजाबचा कर्णधार रविचंद्रन आश्विनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत दिल्लीच्या टीमने कर्णधार गौतम गंभीरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबला २० षटकांत १६७ धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून के एल राहुल आणि मयंक अग्रवाल जोडी मैदानात उतरली होती. त्यानंतर राहुलने दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत वादळी अर्धशतक ठोकलं होतं.

नक्की वाचा – IPL History: ‘त्या’ दोन सामन्यांमध्ये युवराज सिंग चमकला; IPL मध्ये इतिहास रचत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी

आश्चर्याची बाब म्हणजे ३. ४ षटकात मयंकचा विकेट ७ धावांवर गेला होता. पण त्याचदरम्यान राहुलने ५० धावा कुटल्या होत्या. राहुलने या सामन्यात १६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा कुटल्या होत्या. राहुलच्या धावांच्या जोरावर पंजाबने दिल्लीला ६ विकेट्सने पराभूत केलं होतं. के एल राहुलने आयपीएल करिअरच्या ६७ सामन्यांत ४२.०६ च्या सरासरीनं १९७७ धावा कुटल्या. याचसोबत राहुलने १ शतक आणि १६ अर्धशतकही ठोकले. याचदरम्यान राहुलचा स्ट्राईक रेट १३८.१५ इतका होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K l rahul smashes 6 fours and 4 sixes against delhi capitals rahul sets fastest fifty record in ipl nss
First published on: 24-03-2023 at 19:49 IST