सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि तरुण भारत व्यायाम मंडळ, सांगली यांच्यातर्फे आयोजित ५९व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत मुंबई उपनगर आणि पुण्याने विजयी सलामी दिली.
 पुरुष गटात मुंबई उपनगरने लातूर संघावर ८५-२२ असा विजय मिळवला. राजू लोहार आणि नीलेश शिंदे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
महिला गटात पुण्याने रत्नागिरीचा ५३-१४ असा पराभव केला. स्नेहल शिंदेने पुण्याच्या विजयात चमकदार कामगिरी केली.