scorecardresearch

WI vs SA: धक्कादायक! विकेट घेतल्याचा आनंद साजरा करायला गेला, अन् स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर पडला

WI vs SA Test: विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करताना केशव महाराज गंभीर जखमी झाला. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर न्यावे लागले.

Keshav Maharaj was seriously injured
केशव महाराज (फोटो-ट्विटर)

Keshav Maharaj Seriously Injured: दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकून विंडीजचा धुव्वा उडवला. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात विंडीजला १०६ धावांत गुंडाळून २८४ धावांनी सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३२१ धावा केल्या आणि चौथ्या डावात वेस्ट इंडिजसमोर ३९१ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, यादरम्यान संघाचा स्टार फिरकीपटू केशव महाराज विचित्र पद्धतीने दुखापत झाल्याने त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

केशव महाराज वेदना होऊ लागल्याने खाली बसला –

पहिल्या सत्राच्या शेवटच्या षटकात महाराजने मेयर्सला स्टंपसमोर पायचीत केले केले. पंचाने त्याला नॉट आऊट घोषित केले, मग महाराजने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि डीआरएस घेतला. स्क्रिनने त्यांच्या बाजूने निकाल दाखवला, तेव्हा महाराज आनंदोत्सव साजरा करणार होता, इतक्यात त्याच्या पायाचा घोटा मुरगळला आणि त्या वेदना होऊ लागल्याने तो खाली बसला.

स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर पाठवावे लागले –

यानंतर लगेच स्ट्रेचर बोलावून त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. नंतर त्याला एमआरआय स्कॅनसाठी नेण्यात आले. फॉक्स स्पोर्ट्सच्या मते, स्पिनरच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. आदल्या दिवशी फलंदाजी करताना दुखापत झाल्यानंतर विआन मुल्डरलाही स्कॅनसाठी न्यावे लागले होते.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: शुबमन गिलने शतक झळकावत रचला विक्रम; सचिन-विराटच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाला सामील

आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला फ्रॅक्चर नाही झाले. मुल्डरला मैदानात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने दुसऱ्या डावात रोस्टन चेस आणि काइल मेयर यांना बाद करत दोन बळी घेतले. एडन मार्करामला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार देण्यात आला.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रायन रिकेल्टन, हेनरिक क्लासेन , विआन मुल्डर, सायमन हार्मर, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रीफर, जर्मेन ब्लॅकवुड, रोस्टन चेस, काइल मेयर्स, जोशुआ दा सिल्वा, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, गुडाकेश मोटी

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 21:43 IST
ताज्या बातम्या